
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शिवरा ( गोपाल नगर ) येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिंडी संमेलन आयोजित केले होते या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या चा ग्राम भुषण म्हणून सत्कार करण्यात आला होता माननीय मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत दिंडी संमेलन मध्ये ग्राम भुषण म्हणून सत्कार करण्यात आला होता या कार्यक्रमात सहभागी अध्यक्ष मा डॉ कुणाल भोयर शहर अध्यक्ष राळेगाव भारतीय जनता पक्ष आणि दिंडी संमेलन मध्ये उद्घाटक म्हणून संत बालयोगी अनंत महाराज श्रीरामपूर कोदुर्ली तसेच विशेष उपस्थिती मा रणधिर कीनाके जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वारकरी सांप्रदायिक संघटना यवतमाळ मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ मा गंगाधरजी घोटेकर आजिवन प्रचारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मा संतोष शर्मा राधा स्वामी सतसंघ जोडमोहा मा बंडुजी भुडे ग्राम पंचायत सदस्य श्रीरामपूर मा बावने साहेब सेवा निवृत्त पोलीस अधिकारी मा महादेवराव मेश्राम ग्राम पंचायत सदस्य श्रीरामपूर लक्ष्मण किनेकर ग्राम पंचायत सदस्य शेळी मा दिनकर वाकुलकर चारुदत्त नेरकर यवतमाळ या सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत ग्राम भुषण सत्कार सोहळा आणि दिंडी संमेलन कार्यक्रम यशस्वी झाला होता कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच आणि ” तुकड्या ची झोपडी ” साहित्यिक म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम गिता चा प्रचार आणि प्रसार करुन ग्राम स्वराज्याचे महत्त्व पटवून सांगितले म्हणून ग्रामीण भागातील लोकांनी मा मधुसूदन कोवे गुरुजी यांच्या कार्याचा गुणगौरव ” ग्राम भुषण ” म्हणून केला आहे हा समाज गौरव आहे म्हणून आम्ही तो स्विकारतो आहे असे स्पष्ट मत कोवे गुरुजी यांनी मांडले या कार्यक्रमाचे आयोजन मा भगवान जी कोवे आणि गुरुदेव सेवा मंडळ शिवरा ( गोपाल नगर ) यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चौधरी एकलारा यांनी केले होते या कार्यक्रमात तिरझडा दिंडी, सावंगी दिंडी कोदुर्ली दिंडी इसापूर दिंडी यांना नारळ पानं देऊन सन्मानित करण्यात आले होते या कार्यक्रमात सहभागी अशोक मंगाम दिलीप मेश्राम कैलास धुमाळ नरेंद्र आडे बाबाराव येलेकर अन्नाजी चांदेकर शालिक कोवे सदानंद मंगाम नानाजी कोवे अमोल तोडासे वसंतराव सलामे सुरेश उइके दुर्गादास मेश्राम कीशोर आडे वसंतराव ठाकरे मनोज वाकुलकर अशोकराव मेश्राम सर्व आजु बाजू चे गुरुदेव सेवा मंडळ मधील भजनी सदस्य याचा समावेश होता महाप्रसाद देवुन दिंडी संमेलनाची समाप्ती करण्यात आली होती
