वरूड जहाँगीर येथे रघुनाथ स्वामी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी खेळाचे आयोजन,54000 हजार रूपयांची आकर्षक बक्षिसे

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे गाव एका वेळी कबड्डी या खेळासाठी प्रसिद्धीस आलेले गाव असून या गावात एक म्हण प्रचलित झाली होती कि , घर तेथे खेळाडू. आणि ती म्हण आज सुद्धा कायम असून या गावाला कबड्डी खेळाचे फार वेड असून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गावातील कबड्डी प्रेमी तरूणांनी गावात कबड्डी या खेळाचे आयोजन केले असून प्रथम पारितोषिक 21000 रूपये रोख बक्षीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र तेलंगे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री विनोद काकडे यांच्या कडून, द्वितीय पारितोषिक15000रूपये रोख भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री चित्तरंजन कोल्हे व खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर यांच्या कडून, तृतीय पारितोषिक 11000 रूपये रोख माजी पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे व बंडू राठोड यांच्या कडून तर चतुर्थ पारितोषिक 7000 रूपये रोख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वरघट यांच्या कडून ठेवण्यात आले असून या खेळाचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद काकडे, माजी पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर, वसंत जिनिंग राळेगावचे संचालक रामधन राठोड, राळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हमिदभाई पठाण, बजरंग हिकरे, सेवानिवृत्त शिक्षक तथा माजी कबड्डी खेळाडू मारोतराव मडावी , मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वरघट, डॉ.कुणाल भोयर, राळेगाव पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव, वरूड सरपंच सौ प्रियंका पेंदोर, उपसरपंच कवडूजी मरस्कोल्हे, वरूड पोलिस पाटील नरेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य भानुदास चव्हाण हे मान्यवर उपस्थित राहणार असून या खेळाचे रितसर उद्घाटन रविवारी दिंनाक 26/11/2023 रोजी होणार असून बक्षिस वितरण सुद्धा माजी पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश मेश्राम, जयसिंग पवार, मारोतराव मडावी, नामदेव चव्हाण,रामूजी कोवे, मनोहर राठोड यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असून या प्रसंगी खेळाडूची भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असून क्रिडा प्रेमी तरूणांनी या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने सचिन आत्राम यांनी आवाहन केले आहे.