
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी
दिनांक 19 डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना मौजा गांजेगाव शेत शिवारातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आपली संबंधित अडचण विद्युत वितरण कंपनीच्या पटलावर ठेवली.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक 2 ढाणकी, वितरिका 1 आणि 2 यांना संबंधित धरणातून रब्बी व इतर पिके जोपासण्यासाठी त्यांना टप्प्या टप्प्याने पाण्याची आवर्तने पिके जोपासण्यासाठी पाणी सोडल्या जाते. व याच ठिकाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा सांडवा वाहत असतो. नेमके त्याच व चुकीच्या ठिकाणी कायम स्वरूपात विद्युत वितरण कंपनीच्या ठेकेदाराने रोहित्र बसविले आहे. ज्यावेळी पाण्याचे आवर्तन सोडल्या जाईल त्यावेळी रात्रीला किंवा ज्यावेळी सांडवा पाण्याने प्रवाहित राहील त्यावेळी पाणी देण्यास जावे लागेल. त्या क्षणी बसविलेल्या त्या चुकीच्या ठिकाणच्या रोहित्रा मधून पाण्यामध्ये विद्युत प्रवाहित होऊन जीवित हानी होऊ शकते. व ती जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित रोहित्र अचूक ठिकाणी बसविणे जरुरी आहे. एखाद्या वेळेस शेतकरी किंवा उर्ध्व पैनगंगा विभागाच्या कर्मचाऱ्याला सुद्धा या पासून धोका संभवतो तेव्हा एवढ्या महत्त्वाच्या बाबीची जाण विद्युत वितरण कंपनीच्या ठेकेदाराला नसावी का? हा चर्चेचा विषय बनतो.
एवढे सगळे असताना संबंधित ठेकेदारावर वरिष्ठाची खफा मर्जी आहे का? किंव्हा ठेकेदारच नाकापेक्षा मोती जड होतो का ? हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने पडतो आहे. त्यामुळे एवढे गंभीर बाब असून सुद्धा विद्युत वितरण कंपनीचा ठेकेदार ही कामगिरी सहजपणे करून गेला. हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने पुढे येतो . तसेच जिथून पाटबंधारे विभागाचा सांडवा प्रवाहित होतो अगदी त्याच ठिकाणी रोहित्र बसविण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनातून सांगितले असे असताना पाटबंधारे विभागाची ना हरकत प्रमाणपत्र घेणे सुद्धा जरुरी बनते किंवा संबंधित विभागाला विचारणा सुद्धा करायला हवी होती. पण एवढी तसदी सुद्धा संबंधित विद्युत वितरण कंपनीच्या ठेकेदारांनी घेतलेली दिसत नाही. यामुळे विद्युत वितरण कंपनीचा वचक ठेकेदारावर राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो तसेच भविष्यात जीवित हानी वित्तहानी सुद्धा होऊ शकते ती टाळण्यासाठी बसविलेले रोहित्र तत्काळ हटवून योग्य व अचूक ठिकाणी बसविण्यात यावे. अशा प्रकारचे निवेदन यावेळी विद्युत वितरण कंपनीला देण्यात आले. यावेळी या भागातील शेतकरी नितीन येरावार, कृष्णनाथ कोडगिरवार , प्रकाश येरावार , राजाराम वैद्य, बापूराव वैद्य. इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
