
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय पात्रता परीक्षेचा निकाल 17/03/2026 ला लागला असून या परीक्षेत संत तुकडोजी महाराज उच्च प्राथमिक शाळा राळेगाव येथील एकूण 15 विद्यार्थी बसले होते. यापैकी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. ऋन्मई महादेव मेश्राम हिने 82.50 टक्के गुण घेत शाळेतून प्रथम तर कु. लावण्या रुपेश शेंडे हिने 70 टक्के गुण घेत दुसरा तर अनिरुद्ध अरविंद निखाडे याने 68. 75 टक्के गुण प्राप्त करत शाळेतून तिसरा क्रमांक पटकाविला आहेत. शाळेतील या गुणवंत विद्यार्थयांपैकी शाळेतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याना विशेष पारितोषिक देऊन त्यांचा शाळेतील श्री. पाहुणे सर यांनी सत्कार केला. तसेच शाळेचे सचिव श्री. श्रीधर येनोरकर सर , जेष्ठ शिक्षिका सौ. ज्योती येनोरकर मॅडम, मुख्याध्यापक श्री. उमेश बुरले आणि शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शक श्री. अमोल पाहुणे सर यांचे अभिनंदन करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
