
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीने १० मे २०२५ रोजी जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, देशाच्या सीमांवर तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाने एकजुटीने व एकात्मतेने आपल्या शूर सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे.
याच राष्ट्रीय भावनेतून, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. प्रफुल मानकर यांनी कळविल्याप्रमाणे, नियोजित आंदोलन तत्काळ रद्द करण्यात येत आहे. देशहित हेच सर्वात मोठे हित असून, अशा संकटाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाऐवजी देशाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना व पाठिंबा आवश्यक आहे.
आंदोलनाची मागणी आणि जनतेच्या प्रश्नांवर आमचा आवाज पूर्वीप्रमाणेच बुलंद राहील. योग्य वेळ येताच आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येईल.
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी जनतेच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करते व सर्व नागरिकांनी शांतता आणि संयम पाळून देशाच्या ऐक्याला बळ द्यावे, असे आवाहन करीत आहे
प्रफुल मानकर
जिल्हाध्यक्ष,
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी
