मध्यरात्रीच्या सुमारास सरसम येथील दुकानाला भीषण आग; 5 लाखाचे नुकसान सर्व सामान जळून खाक.

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी : प्रशांत राहुलवाड

                           . ...

हिमायतनगर – तालुक्यातील सरसम येथील न्यू साई किराणा दुकान आगीत खाक झाले ,चार ते पाच लाख रुपयांचे सामान जळून खाक
साईनाथ रामजी कुचलवाड या युवकांनी व्यवसायात भरारी घेत प्रगती साधत किराणा दुकान चालवित होता काल रात्री 3 च्या सुमारास दुकानात आग लागून संपूर्ण दुकान खाक झाले. त्यात चार पाच लाख रुपये नुकसान अंदाज झाले.
आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. शॉकसर्किट असू शकते किराणा दुकानाच्या लागलेल्या आगीत मधील तुपाचे डबे, साबण, बिस्कीट, सोडा, मसालेचे बॉक्स, मुरमुरे थैले, अगरबत्ती यासह किराणामालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. दुकानातील अनेक वस्तू जळून खाक झाले आहेत. अशी माहीती दुकानदार मालकांनी दिली.
सोमवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली सरसम भागातील न्यू साई किराणा दुकानात भीषण आग लागली. दरम्यान, रात्रीची वेळ असल्याने ती आग पसरली. यामुळे दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले.

आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी दुकान मालकास तात्काळ माहिती दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक बी डी भुसनुर साहेब यांचा मार्गदर्शनाखाली व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला.