
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सध्या तुरीच्या दरात वाढ झाली असून तुरीने १२००० रुपयाच्या जवळपास पल्ला पार केला आहे तर सोयाबीनचे भाव मात्र स्थिरावले आहे. सोयाबीनला केवळ ४००० ते ४२०० रुपयांचा भाव मिळत असून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
यंदा खरिपात पावसाचा लहरीपणाचा आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन तूर कापसासह सर्वच पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
तालुक्यातील शेतकरी कापसा पाटोपाट नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन कडे पाहतात परंतु यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली त्यामुळे भाव तरी समाधानकारक मिळेल अशी आशा होती किमान ६००० रुपयांचा भाव अपेक्षित असताना सोयाबीन ने पाच हजाराचा पल्लाही गाठला नाही.
सुरुवाती पासूनच सोयाबीनला ४५०० ते ४८०० दरम्यान भाव मिळत होता मात्र काही दिवसांनी भाव वाढतील अशी आशा असताना या सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली. मागील काही दिवसापासून सरासरी केवळ चार हजार दोनशे रुपये पर्यंत भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्याचे नाराजी पुढे येत होती. तर तुरीला सध्या समाधानकारक भाव मिळत असला तरी तुरीच्या पिकात उत्पादनात प्रचंड घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तुरच शिल्लक नसल्याचे चित्र आहे ज्या काही शेतकऱ्याकडे तूर आहे ते विक्रीसाठी आणत आहे परंतु राळेगाव शहरात अपेक्षित आवक होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी तुरीची आवक कमी असल्याचे सांगितले जात आहे सध्या तालुक्यात तुरीला ११००० च्या वरती भाव मिळत आहे हा भाव समाधानकारक असला तरी उत्पादन घटल्याने विक्रीसाठी तूर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
