
प्रवीण जोशी (प्रती)
ढाणकी
उमरखेड तालुक्यातील ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या बंदी भागातील मुरली दराटी खरबी निंगनूर कृष्णापुर येथे गेल्या कित्येक वर्षांपासून बोगस बंगाली डॉक्टरांचा बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे किंवा कोणत्याही प्रकारची वैद्यकीय परवानगी नसतांना आदिवासी बहुल भागातील भोळ्या भाबड्या जनतेवर उपचार करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गावातील स्वयंघोषित नेत्यांना व काही नागरीकांना हाताखाली घेऊन हे डॉक्टर आपला धंदा चालवत असल्याचे परीसरात खंमग चर्चा रंगतांना दिसून येत आहे. मुरली मोरचंडी ही गावे उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असल्याने आरोग्य अधिकारी यांचे या बोगस डॉक्टर कडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न परीसरातील नागरिक करीत आहे. बोगस डॉक्टर वर कारवाई झाली असे गेल्या कित्येक दिवसापासून ऐकिवात नाही आणि कारवाई झाली तरी ती थातूरमातूर स्वरूपाची होते. बोगस डॉक्टरावर आरोग्य विभाग पोलीस प्रशासनाकडून थातूर मातूर कारवाई करून सोडून देण्यात आल्याने बोगस डॉक्टर चांगलेच फोफावल्या चे दिसून येत आता जिल्हा आरोग्य अधिकारी या बोगस डॉक्टर कडे लक्ष देतील का? हे पाहणे गरजेचे आहे.
