
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके उत्सव समितीच्या वतीने दिं.९ ऑगस्ट २०२५ रोज शनिवारला शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी जय सेवा जय जौहार अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
शहरातील सकाळी ११:०० वाजता शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या वीर बाबुराव शेडमाके यांच्या तैल चित्राजवळून रॅलीला सुरुवात करण्यात आली असून सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वीर भगतसिंग पहांदी पारी कुपार लिंगो, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,राणी दुर्गावती अण्णाभाऊ साठे, यांच्या पुतळ्याला व तैलचित्राला रॅली दरम्यान हार अर्पण करून. शहरातून विविध मार्गाने रॅली काढण्यात आली. त्यानंतर या रॅलीचा समारोप वीर बाबुराव शेडमाके यांच्या तैल चित्रा जवळ करण्यात आला.
त्यानंतर समरोपीय अभेचे आयोजन करण्यात आले असून सभेच्या अध्यक्ष स्थानी महेश कोडापे, सेवानिवृत्त आयुक्त अन्न निरीक्षक मुंबई, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर गेडाम, सेवा निवृत्त तहसीलदार, मंगेश राऊत, नगर सेवक दिलीप कन्नाके, युसुफअली सैयद,अरविंद तामगाडगे, लियाकत अल्ली मधुकर राजुरकर, संदीप पेंदोर वाल्मिराव मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन शंकर कोहचाडे यांनी केले तर प्रास्ताविक अरविंद केराम यांनी केले.तर रामचंद्र मेश्राम यांनी पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे यशस्वीते करिता राजेश्वर मडावी, नानाजी कोवे, कल्पना शेडमाके, मारोतराव शेडमाके रेखा केराम, सविता मोहोद, पुरुषोत्तम मडावी, सुरेखा मडावी, स्वाती मेश्राम,मेश्राम ताई, उईके ताuई, गजानन मेश्राम,देवा मंगाम, मधुकर पावले, रजनीकांत परचाके, गजानन तुमराम, अशोक येलके, अशोक भागवत, संजय दुरबुडे, गोपाळ आडे,यांनी सहकार्य केले.
