


प्रतिनिधी. चैतन्य कोहळे
भद्रावती शहरातील सुमठाणा – तेलवासा रोड मार्गावरील शासकीय आयटीआय समोर झाडे यांच्या शेतात एका अंदाजे 25 वर्षीय युवतीचे धडावेगळे निवस्त्र अवस्थेत शव आढळून आले असून भद्रावती परिसर सदर घटनेने हादरून गेले आहे.
सदर घटनेच्या चौकशीसाठी चंद्रपूर वरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या टीम दाखल झाले आहे. सदर युवतीच्या प्रेता संदर्भात जिल्हा पोलिस प्रशासनाच्या उपस्थित वेगवेगळ्या मेडिकल, डी एन ए टीम दाखल झाल्यात सदर बाबी संदर्भात चाचण्या घेण्यात येऊन युवतीचे प्रेत मेडिकल चौकशीसाठी पाठवण्यात आले असुन पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.
