
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग व यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना खालील मागण्या घेऊन देशाच्या राष्ट्रपती महोदयांना यांना पाठविण्यासाठी देण्यात आले असून 1 संपूर्ण देशात जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. 2 लोकसभा, राज्यसभा, विधानसभा तसेच विधानपरिषदेत 33% महिला आरक्षणाचा ठराव संमत झाला असून त्यापैकी 15%आरक्षण हे ओबीसी महिलांना देण्यात यावे .3 ओबीसी प्रवर्गातील नाॅन क्रिमीलियरची अट पूर्णपणे रद्द करण्यात यावी.4 महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या कंत्राटी कामगार भरतीचा निर्णय रद्द करण्यात यावा.5 महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. वरील सर्व मागण्याचा योग्य निर्णय घेऊन ओबीसी प्रवर्गास न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन आज अनेक पदाधिकारी बांधवांच्या सह्या सह देशाच्या राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत देण्यात आले त्यावेळी अरविंद वाढोणकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग, संजय ठाकरे प्रदेशाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन,अनिल गायकवाड कार्याध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग, बाळासाहेब मांगुळकर,मनिष पाटील,जावेद परवेज अन्सारी,राहूल ठाकरे, अशोक बोबडे, चंद्रशेखर चौधरी, रविंद्र ढोक,जया पोटे, प्रकाश जानकर, अशोक तिखे, डॉ.अनिल देशमुख, प्रदीप साळवे, शशांक केंढे,राजू पोटे, राजेंद्र तेलंगे,मोहन बनकर,संतोष झेंडे,व्ही. एम वादाफळे, के.एन. मोरे, राजेंद्र ओंकार, रविंद्र ढोक, शैलेश गुल्हाने,यादव खेरडे,अमेय होले, संतोष बोरले, अशोक काचोळे, विनोद जयपूरकर, प्रफुल्ल तायवाडे, जितेंद्र ब्राम्हणकर, साहेबराव जुनगरे,शरद पोटूरकर, विजय काळे,राम घोटेकार, प्रदीप वादाफळे,उमेश क्षिरसागर,बबलीभाई,आरिफ खान,अजय किन्हेकार ,विजय खरोडे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती इंजिनिअर अरविंद वाढोणकर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग अध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
