दप्तर विरहित शाळा उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अंतरगाव-शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव येथे दप्तर विरहित शाळा उपक्रम राबविण्यात आला…सर्व विद्यार्थी छान कोवळ्या उन्हात बसली होती, कार्यक्रमाची सुरुवात राजकुमार तागडे सर यांनी कबुतर व मुंगी यांची बोधप्रद कथा सांगुन केली,त्यांनंतर संदीप सुरपाम सर यांनी शरीर रचना व प्रत्येक अवयव व त्यांचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले,अजय नरडवार सर यांनी इंग्रजी विषय सोपा कसा वाटेल,स्वर व्यंजन,शब्द व वाक्य रचना याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारुन विषय शिक्षकांकडून त्यांचे निराकरण करण्यात आले… कार्यक्रमाला सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.