नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक सभा संपन्न,विविध शालेय स्तरीय समित्या गठीत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

तालुक्यातील नामांकित शाळा नेताजी विद्यालय राळेगाव येथे दि 19 जुलै 2024 ला पालक सभेचे आयोजन करण्यात आले त्यात सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ओंकार तर प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव परिवहन विभागाचे वाहतूक नियंत्रक एम सी हुकरे, पालक श्री कैलास राऊत आणि सौ अनुराधा कापसे हे होते. सदर सभेमध्ये पालक शिक्षक संघ, शालेय परिवहन समिती तसेच विविध शालेय स्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या. उपरोक्त समितीचे कार्य उद्देश मा मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविकातून समजावून सांगितले.बाहेर गाव वरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती श्री हुकरे यांनी दिली. तर पालक वर्गाकडून सदर सुरू असलेले बसचे वेळापत्रक हे विद्यार्थ्यांचे हित जोपासून वेळापत्रक करावे अशी मागणी करण्यात आली असून प्रशासन यांनी लाडकी बहीण, भाऊ अश्या योजना सुरू केल्या त्या पेक्षा लाडके विद्यार्थी देश्याचे भविष्य या योजना सुरू कराव्या असा सुधा सुर पालक वर्ग्रातून दिसून आला असून सदर मुला मुलींना प्रवासात होत असलेला त्रास त्या संदर्भात लेखी तक्रार पालक वर्ग व मुख्याध्यापक ओंकार सर यांनी माहिती दिली, सदर सभेचे संचालन सहाय्यक शिक्षक व्ही आर कुबडे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका कु एम बी नागरे यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक पी एस वासेकर,कु एम ए केवटे, कु आर डी सिडाम,कु एम डी सोनोने, कु एस एस चावट, कु एस बी वानखडे तसेच शिपाई सचिन पांडे यांनी सहकार्य केले.