
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथे काल रात्री अंदाजे साडेनवू वाजता राळेगाव वरून वडकी येथे मोटरसायकल वर जात असताना दत्ता भोयर व प्रविण राऊत यांच्या मोटरसायकल ला कुत्रा आडवा आल्याने दोघेही मोटरसायकल वरुन खाली पडले दोघांना रक्तस्राव सुरू झाला या गोष्टीची माहिती प्रकाश पोपट मित्र परिवाराला माहिती होताच अतुल पराते,राजू सैय्यद यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाढोना बाजार येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता तेथे एकही कर्मचारी हजर नव्हते रुग्णसेवक यांनी लगेच राळेगाव येथे जखमींना रुग्णालयात दाखल केले विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वर्षात दहा ते बारा डाॅक्टर बदलून गेले आहे तालुक्यात संध्या साप,विंचू, पाॅयझन तसेच एक्सडेंन्टचे प्रमान वाढले उपचारासाठी येथे नेले असता रात्री च्या वेळी येथे कोनीही दिसून येत नाही कर्मचारी अपडाऊन मधे व्यस्त असतात या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वताच्या मनाचा मनमानी कारभार चालू आहे या गोष्टिकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन येथे मुख्यालयी कायमस्वरूपी डाॅक्टर देन्यात यावे अशी वाढोना बाजार तसेच परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांची मागणी जोर धरत आहे.
