
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव (ग्रामीण): नुकत्याच शासकीय नियमा अनुसार जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात प्रत्येक केंद्राच्या वाट्याला काही ना काही शिक्षक देण्यात आले. परंतु राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खैरी या गावी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी येथे पदवीधर व उच्च श्रेणी शिक्षक श्री सिडम सर यांची वर्ग सहा ते आठ या वर्गासाठी१२/०९/२०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली. परंतु ते सेवा जेष्ठ शिक्षक असल्यामुळे त्यांच्याकडे शाळेचा प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार न देता त्यांना२५/०९/२०२५ रोजी डिग डोह येथील एक ते चार वर्ग असलेल्या शाळेवर तेरा दिवसांनी कार्यमुक्त करण्यात आले. कारण की त्यांच्याच विषयाचे शिक्षक श्री दूरबुडे हे यांची बदली न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे त्यांना खैरी शाळेवरून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. परंतु त्यांना दुसऱ्यावर डेपुटेशन देता येत असतानाही सेवा जेष्ठ शिक्षक श्री सिडाम यांचेच तेरा दिवसानंतर डेपुटेशन का काढण्यात आली हा प्रश्न अनुत्तरीत आहे. की कदाचित वरिष्ठ अधिकाऱ्याला भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तू काय करायचं तर कर असे तर कुठून आश्वासन मिळाले नाही ना?
… वास्तविक शैक्षणिक न्यायालयीन प्रक्रियेनुसार कोणतेही शिक्षकाची दुसऱ्या शाळेवर विषय शिक्षक म्हणून बदली झाली असता व तो सेवा जेष्ठ शिक्षक असतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे चार ते पाच दिवसात शाळेचा मुख्याध्यापकाचा प्रभार द्यावयाचा असतो परंतु असे न होता सेवा जेष्ठ शिक्षकालाच एक ते चार सारख्या कनिष्ठ शाळेवर पाठवून शिक्षण विभागाने त्यांना अवमान केला नाही का हा प्रश्न निर्माण होत नाही का? कारण की दुसरे कोर्ट मॅटर मुळे बदली होऊन शकत असलेले शिक्षक यांना सद्धा डेपुटेशनवर पाठवण्यात येऊ शकत होते परंतु तसे न करता सेवा जष्ठ पदवीधर शिक्षकालाच डेपुटेशनवर का पाठवण्यात आले हा प्रश्न खैरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर काही सदस्य व गावकऱ्यांना पडला आहे. तसेच इयत्ता एक ते पाच मधील शिक्षकाला च नियमाने सुद्धा डेपुटेशन देण्यात यायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. याउलट तालुक्यात नियमाने बदलून आलेल्या काही मोजक्या शाळेच्या शिक्षकास सुद्धा त्यांना मिळालेल्या जागेवर नियुक्ती न देता तालुक्यातून त्यांच्या सवलतीने धानोरा केंद्रातील शिक्षक वडकी केंद्रात खरेदी केंद्रातील शिक्षक वडकी केंद्रात असे नियुक्त करण्यात आल्याचे समजte खैरी केंद्रात एकच जागा रिक्त असताना महिला शिक्षकेला खैरी या शाळेवर देऊन खैरी या शाळेतील एका पुरुष शिक्षकाला डिगढोह प्रतिनियुक्ती आपापसात करता येत होती. हे गटशिक्षणाधिकारी व गट विस्तार अधिकारी यांच्या लक्षात आले नाही का? परंतु भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे काही पाठबळ तर या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे नाही ना?
… तसेच तालुक्यातील बऱ्याच शिक्षकांच्या किंवा शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या ह्या खरोखरच त्यांना मिळालेल्या नियम आदेशानुसार झाल्या आहेत का ह्याही प्रश्नाचे उत्तर गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांनी द्यावी अशी तालुक्यातील जनतेतून मागणी होत आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या पाठबळामुळेच तर हे अधिकारी कोणालाही धजावताना दिसत नाही
या सर्व गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता खैरी येथील वर्ग सहा ते आठ या वर्गासाठी आलेले शिक्षक इथून बदलून जाऊन जवळपास २५ ते २७ दिवस झाले यात विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत आहे . तेव्हा त्याच ठिकाणी त्यांच्या जागेवर बदली होऊन आलेले शिक्षक श्री सिडम सर यांना तात्काळ खैरी येथे नियुक्त करावे अन्यथा विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून खुशाल वानखेडे हे काही पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमरण उपोषणाचा मार्ग पत्करत आहे तरी या गंभीर बाबीची तात्काळ दाखल घेऊन व सहा ते आठ या वर्गाचे विद्यार्थ्याचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित त्या ठिकाणी बदलून आलेले शिक्षक श्री सिडाम यांना तात्काळ सुरू करावे असा विनंती अर्ज गटशिक्षणाधिकारी रायगाव यांच्याकडे दिला असून यावर काय कार्यवाही करतात याकडे खैरी ग्राम वर्षाचे लक्ष लागले आहे. त्वरित शिक्षक न मिळाल्यास खुशाल वानखेडे हे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणास बसणार हे मात्र नक्की असे समजते. की गटशिक्षणाधिकारी व गटविस्तार अधिकारी यांना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अज्ञात शक्तीचा आशीर्वाद तर नाही ना? त्यामुळे ते या ठिकाणी शिक्षकाची तात्काळ नियुक्ती करण्यास विलंब तर करत नाही आहे ना असा खैरी गावातील सुज्ञ नागरिक समजत आहे. मात्र शिक्षकाच्या मागणीसाठी रायगाव शिक्षण विभागाकडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी निवेदन सादर केले आहे व उपोषणाचा मार्ग पद करणार हे सुद्धा त्यात सांगितले आहे.
