धक्कादायक’:इजासन येथील टेकळीवर आढळले मानवी शरीराची हाडे,घातपात असण्याची शक्यता

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

वणी तालुक्यातील इजासन (गोडगाव) येथील पठारावर २७ जुलै 2021रोजी पळसाच्या झाडाखाली मानवी शरीराचे कुजलेला अवस्थेतील हाडे आढळून आली होतीसविस्तर वृत असे की दिनांक २७ जुलै २०२१ रोजी सदर गावातील युवक शेळ्या चारायला पठारावर गेला असता त्याला त्या ठिकाणी कूजलेली हाडे साडी मंगळसूत्र इत्यादी आढळुन आले होते त्यांनुसार त्याने इजासन येथील पोलिस पाटिल यांना माहिती दिली होती

त्या माहितीनुसार फिर्यादी चिनू आय्या कुमरे वय (६५) यानी घटनास्थळी जावून बघितले आणि मुकुटबन पोलिस स्टेशन येथे २७ जुलै‌ रोजी आपली मुलगी सुनिता रामजी आत्राम वय (२९ )ही बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती त्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता पठारावर पळसाच्या झाडाखाली
साडी कुजलेली हाडे मंगळसूत्र इत्यादी आढळुन आले होते आणि ती हाडे साडी मंगळसूत्र इत्यादी पाहणाऱ्यांच्या व घरच्यांच्या सांगण्यानुसार ती सुनिताच असल्याचे निष्पन्न झाले होते

या घटनेनुसार मृत महीला विवाहित होती आणि मृत महीलेच्या डोक्यात फरक असल्याने ती गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून घरून बेपत्ता होती
असे तिच्या घरातील लोकांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे

तरी सुनिता या महिलेचा घातपात की आत्महत्या याची माहिती घेण्यासाठी संपुर्ण हाडे वैद्यकिय महाविद्यालयात परिक्षण करण्यासाठीं पाठविण्यात आले आहे तरी घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ऋषी ठाकूर करीत आहे