
सहसंपादक : रामभाऊ भोयर
येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात तसेच गणेशोत्सवा दरम्यान शांततामय वातावरण सण उत्सव साजरे वाव्हेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी रॉबिन बन्सल यांनी आयोजित शांतता सलोखा समितीच्या सभेत बोलताना व्यक्त केले.
राळेगाव येथील पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक शितल मालटे यांच्या मार्गदर्शनात दिं.२० ऑगस्ट २०२५ रोज बुधवार ला तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
यावेळी शांतता कमिटीच्या सभेला मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल हे होते तर अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तर प्रमुख किरण किन्नाके नायब तहसीलदार, उपस्थित होत्या .यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी तालुक्यातील गणेश मंडळाकडून गणेशोत्सवाच्या काळात उल्लेखनीय उपक्रम जसे रक्तदान शिबिर,या सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळाला सन्मानित करण्यात येणार अशी माहिती पाटील यांनी दिली आहे .तसेच तालुक्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात तथा सन उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी
शहरात कोणत्याही समाजा समाजात वादविवाद नसून सर्व समाज बांधव एकोप्याने राहत आहेत त्यामुळे शहरात शांततामय वातावरण आहे असे मनोगत सामाजिक कार्यकर्ते विनय मुनोत,गोवर्धन वाघमारे, नगरसेवक बाळू धुमाळ, अप्सराअल्ली सैयद यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित पोलीस पाटील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिव होते.तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी एपीआय योगेश दंदे,पीएसआय विशाल बोरकर, एचसी गोपाल वॉस्टर, एनपिसी रुपेश जाधव,एनपिसी सूरज चिवाने आधी होते ,या शांतता कमिटीच्या सभेचे सूत्रसंचालन एपीआय योगेश कुमार दंदे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक शितल मालटे यांनी केले.
