सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे मस्त मवाल आहे. परिणामी, पोलिस प्रशासन मी नाही त्यातली कडी लाव आतली अशी भूमिका बजावत असल्याने रेती उत्खनन जोमात वाढले आहे.
राळेगाव तालुक्यातील कोणत्याही घाटातील लिलाव झाला नसून धर्मापुर, वाऱ्हा 1 व 2, सावंगी, मेंघापुर, जागजई आणि इतर अनेक नाल्यातून व घाटांमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले असून, स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. महसूल विभागाकडून कडक कारवाई अभावाने होत असल्याने वाळू माफियांना कुठलाही धाक राहिलेला नाही.
पोलिसांची आप्त स्वकियाकडून कारवाई न करता महसूल विभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष असल्याने मात्र, महसूल विभागाच्या सहभागाशिवाय अवैध रेती उपसा तस्करी वर कारवाई अपुरी ठरत आहे. त्यामुळे महसूल विभागाला अधिक जबाबदारी घेण्याची मागणी जोर धरत आहे.
महसूल आणि पोलिस प्रशासनाने समन्वय साधून कठोर कारवाई करावी. हीच मागणी सध्या घरकुल धरकाकडून होताना दिसून येत आहे, सरकारने अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ठोस धोरण राबवावे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि वाळू माफियांवर कठोर पावले उचलावीत.
सरकार आणि प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर त्वरित लक्ष द्यावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
🎁
पर्यावरण संवर्धन समिती यवतमाळ जिल्हा अवैध होत असलेली वृक्षतोड व रेती तस्करी यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी याकडे प्रशासनांनी आपली जबर भूमिका न घेतल्यास आंदोलनाचा व उपोषणाचा मार्ग अवलंबवीला जाहील असे पर्यावरण संवर्धन समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोहर बोभाटे यांनी सुचविले आहे.
