
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शितलच्या जिद्दीची कहानी: राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या दिग्दर्शकांच्या वेबसीरीजमध्ये
मोहदा:-पांढरकवडा तालुक्यातील कृष्णापूरच्या लेकीने नाटक ते चित्रपट असा यशस्वी प्रवास केला आहे. जिद्द आणि चिकाटीमुळे तिचा यशस्वी प्रवास झाला आहे. तिच्या कामामुळे तिला राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या नष्या वेबसिरीजमधून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विदर्भातल्या एका छोट्या गावातली मुलगी शीतल श्रीराम राऊत हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख
● आई वडिलांचे पोत्साहन आणि माझे या क्षेत्रातील गुरू सदानंद बोरकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्यातील कला रसिकांपुढे सादर करू शकत आहे. ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर’ आणि तेही राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची मिळालेली संधी मोठी आहे.
शीतल राऊत,अभिनेत्री.
जयवंत वाडकर, गौरव मोरे, किशोर कदम अशा अनेक दिग्गज कलावंतांसोबत काम करणारी शीतल निर्माण केली आहे. अरुण नलावडे, राऊत आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित वेब सिरिजमधून झळकली आहे. या वेबसिरीजमध्ये साजिरी जोशी, क्षिती जोग, शिवराज वायचाळ यांसारख्या दिगज कलावंतांच्या भूमिकादेखील आहेत. पांढरकवडा तालुक्यातील मोहदा गावापासून जवळ असलेल्या कृष्णापूर (सखी) या गावात शीतलचा जन्म झाला. वडील श्रीराम राऊत कृषी व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. शीतलचे प्राथमिक शिक्षण कृष्णापूर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळ येथे घेतले. चंद्रपूर
येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच नृत्याची आवड असल्याने महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमामधूनच तिने अभिनयाची चुणूक दाखविली. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शीतलला चित्रपट क्षेत्रात करिअर करायचे होते. तिने तिच्या स्वप्नांना बळ देत कठोर परिश्रम घेतले, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर झाडीपट्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. शीतलने मराठी चित्रपटात काम केले आहे. अनेक नाटकात भूमिका केल्या आहेत. आता मीठी संधी तिला मिळाली असून ‘ओटीटी प्लॅटफॉर्मकर’ ती बेबसीरीजमध्ये झळकणार आहे.प्रायोगिक रंगभूमीवर
गाजत असलेले नाटकातील ती महत्त्वाच्या भूमिकेत काम करत आहे. त्यासाठी तिला सहायक अभिनेत्री म्हणून नाट्य गौरव नामांकनही मिळालं आहे. अतिशय संवेदनशील खास करून स्त्रियांचे प्रश्न आणि सशक्तीकरण या विषयांची ती निवड करते. तिने आजपर्यंत तसेच प्रोजेक्ट केले आहे. छोट्या गावातून येऊन अभिनयाची आवड जोपासत ती ‘ओटीटी कर पण काम करतेय. तिच्या कामाचं सगळीकडे कौतुक होत आहे. सध्या तिची मुख्य भूमिका असलेला, लहान मुलांच्या कुतुहलाची गोष्ट सांगणारा लघुपट कावळा यू ट्यूबवर आला आहे
