विकासाच्या आड येणाऱ्यांची गय करणार नाही
खा. संजय देशमुख
[हिवरा (द.)येथे सत्कार व आभार कार्यक्रम )

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयरक

   

मतदान हे सर्वश्रेष्ठदान आहे त्याची परतफेड होऊ शकत नाही मात्र दिलेल्या सहकार्याला विसरणारा माणूस मी नाही. विकासकामातून याची पूर्तता करेन, धनशक्ती, सत्ता विरोधात असतांना शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, उद्धव ठाकरे साहेब यांचे कर्तृत्व यावर विश्वास ठेऊन तुमच्या सारखी माणसं पाठीशी उभी राहिली म्हणून हा विजय झाला, हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय आहे, महाविकास आघाडीचा विजय आहे. तुमचा विजय आहे. असे रोखठोक प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी केले. हिवरा (द.)येथे सत्कार व आभार कार्यक्रमाला उत्तर देतांना ते बोलत होते. दी. 17 जुलै रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी शिवसेना नेते किशोर इंगळे, राजेंद्र गायकवाड, हिवरा गावच्या सरपंचा लताताई पाते, बाबासाहेब दरणे,कलीमभाई पटेल, शफिक कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब दरणे मित्र परिवाराच्या वतीने कृ. उ. बा. स. संचालक सचिन दरणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. दोनोडा, हिवरा, कोठा, हुसनापूर,सोनेगाव, बोरजई, तरोडा आदी सह परिसरातील विविध गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रातील गनमान्य नागरिकांनी पावसाच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली.
बाबासाहेब दरणे यांनी मनोगतातुन कृषी क्षेत्रातील समस्या वर भाष्य केले. शासनाचे धोरण शेतकरी हिताचे नाही. लोकप्रतिनिधीना विकासाची दृष्टी नाही. या गावात यायला साधा रस्ता ते देऊ शकले नाही आम्हाला तुमच्या कडून विकासाची अपेक्षा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.त्यावर संजय देशमुख यांनी हाच धागा पकडून मी असा माणूस आहे, कोणी मले सांगितलं इथं जाऊ नको तिथं मी जातोच. राजकीय मतभेद, जात पात, धर्म मानणारा मी माणूस नाही. सत्ता विरोधात आहे, सारे आमदार त्यांचे आहे पण विकासासाठी मी मागेपुढे पहाणार नाही. टक्केवारी शिवाय यांची काम होत नाही मी कुणाची गय करणार नाही. विकासासाठी तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.प्रास्तविकातून विलास मुके यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
अवनी सचिन दरणे या वर्ग 5 च्या विध्यार्थीनीने काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रतिम चित्राचे खासदार संजय देशमुख यांनी कौतुक केले, त्यावर स्वाक्षरी केली व तीला बक्षीस देखील दिले. सत्कार व आभार कार्यक्रमाला राजूभाऊ मांडवकर, सागर ठोंबरे,ग्रा. प. सदस्य सीमाताई दरणे, उमेश दरणे, काकडे साहेब, पंकज मडावी, प्रदीप जाधव, राजू कदम, नानाजी ठाकरे, संजय डफडे, विलास मुके, नाना सिडाम,अमन भोयर, भगवंत बालबुधे, किशोर केवटे, नानाजी धानफुले,दिगंबर मेश्राम, तराडे साहेब, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.