
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विकासाच्या प्रतीक्षेत असणारा राळेगाव विधानसभा मतदार संघ, येथील शेतकरी, कष्टकरी,माता -भगिनीं, बेरोजगार युवक -युवती यांच्या समस्याना वाचा फोडण्यासाठी, एक मजबूत संघटन निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने अशोक मारुती मेश्राम आणि मित्र परिवाराच्या वतीने वडकी ते बाभुळगाव भव्य एकात्मता रैली चे आयोजन 29 ऑगस्ट ( गुरुवार) ला करण्यात आले आहे.राळेगाव, कळंब, बाभुळगाव या तालुक्यातुन ही भव्य रॅली निघणार आहे. बाभुळगाव येथे या रॅली चे सभेत रूपांतर होईल.या ठिकाणी मतदार संघातील विकासाचा जागर भूमिपुत्राची पुढील दिशा ठरवणार आहे. या एकात्मता रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अशोकराव मेश्राम मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
राळेगाव विधानसभा मतदार संघातुन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनी विकासाच्या बाबतीत कोणतेही ठोस काम मतदार संघात केले नाही, कृषी, शिक्षण, आरोग्य, वीज वितरण, प्रशासनावर अंकुश या सह सर्व आघाडयावर जनप्रतिनिधीची उदासीन भूमिका राहिली. इथे कोणताही मोठा प्रकल्प आणल्या गेल्या नाही. कापसावर प्रक्रिया उद्योग नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही,शेतकरी आत्महत्या बाबतीत कुणीही गँभीर नाही निवडून आले त्यांनी आपल्या विकासाच्या पलिकडे जनतेचे भले व्हावे का विचार कधीच मनात आणला नाही,केबिनेट मंत्री म्हणून मतदार संघासाठी त्यांना खुप काही करता आले असते पण मी आणि माझा परिवार यापलीकडे त्यांनी कधी बघितले नाही म्हणून आज या मतदारसंघात बेरोजगारी,शुध्द पिण्याचे पाणी, रोजगाराभिमुख उद्योग, दर्जेदार शैक्षणिक संस्था, सिंचन प्रकल्प उभारण्यात सपशेल अपयशी ठरलेले तेच ते प्रस्थापित उमेदवार पुन्हा सेवा करण्याचे चाकलेट देऊ पहात पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे, गोरगरीब जनता या भुलथापांना बळी पडण्याच्या मानसिकतेत नाही नवीन उमेदवारांच्या शोधात आहे,ही चर्चा पुर्ण मतदार संघात ऐकायला मिळत आहे.अश्यातच अशोक मारुती मेश्राम या भुमिपुत्राने मतदार संघात एक वादळं निर्माण केले .
अशोक मेश्राम राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील मूळ रहिवासी आहेत गेल्या पाच वर्षांपासून मतदार संघातील जनतेशी संवाद साधत आहे व गोरगरीब जनतेसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे त्यामुळे जनमानसात त्यांच्या बद्दल सहानुभूती ची सुप्त लाट दिसते .”देवानं धाडला गरीबाचा माणूस “अशी धारणा घेऊन या एकात्मता रैली चे आयोजन करण्यात आले.वडकी ते बाभुळगाव ही एकात्मता रैली जनतेचा आवाज बुलंद करण्याच्या हेतूने पुढे जाणार आहे.समस्या जाणून घेऊन त्या समस्यांना वाचा फोडून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’बदल हवा, तर चेहरा नवा ‘ जनतेच्या मनातील या भावनेला मूर्त रूप देण्याच्या उद्देशाने निघणाऱ्या या एकात्मता रैली त सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
