जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने कामगारांच्या समस्याचे मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन


सहसंपादक : रामभाऊ भोयर


यवतमाळ जिल्ह्यातील गावंडी बांधकाम व इतर कामगार यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत ग्रामीण भागातील व शहरी भागातील ओरिजनाल 21 प्रकारच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी व रीनवल कऱण्यात येत आहे परंतु महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 13ऑगस्ट 2014 च्या जी आर प्रमाणे ग्रामीण भागातील 21 प्रकारच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार यांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांना सही व शिक्का देण्यासाठी शासनाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असुन सुद्ध जिल्ह्यातील बाभूळगाव राळेगाव इतर तालुक्यांतील ग्रामीण भागात गवंडी बांधकाम व इतर क्षेत्रात काबाड कष्ट करणाऱ्या ओरिजनल कामगारांना ग्रामसेवक खोटी माहिती देऊन दिशाभुल करून ग्रामसेवक संघटनेचा आधार घेऊन मनमानी कारभार करीत असुन शासनाच्या 2020 च्या जी आर प्रमाणे ऑफ लाईन नोंदणीचे काम सुरू असल्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील कामगारांची नोंदणी जलदगतीने व्हावी म्हणून विविध विभागातील शासकीय अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले होते परंतु शासनाने कामगारांची नोंदणी प्रक्रिया 2021 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आल्यामुळे शासनाने 2020 मध्ये जे शासकीय अधिकारी नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 2020 चा जी आर शासनाने नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.तो जी आर रद्द करण्यात आले असुन फक्त
सरकारी कामगार विभागातील अधिकारी हे नोंदणी अधिकारी म्हणून शासनाने अधीकार देण्यात आले आहे परंतु ग्रामसेवक हे चुकीचा अर्थ लावून कामगारांना सागून आम्हाला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का देण्याचा अधिकार नाहीत अशी दिशाभूल करणारी माहिती कामगार यांना ग्रामसेवक देत आहे प्रत्येक्षामध्ये शासनाने तो जि आर सुध्दा रद्द केला असुन ओरिजनल 21प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना नविन नोंदणी व रीनिवल करण्याकरिता मागील वर्षीत 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असतांना ग्रामसेवक हे कामगारांना सही व शिक्का देत नसल्यामुळे कामगारांना मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कामगार हे मंडळाच्या कल्याणकारी योजना पासून वंचीत राहू नये म्हणून जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेने जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा निवेदन दिल्याप्रमाणे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हिम्मत म्हातारमारे यांना दिनांक 25 मे 2024 रोजी कामगारांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का देण्याचे आदेश पारित करण्यात आले होते, तसेच मा मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामसेवकांना ओरिजनल कामगारांना 90 दिवसांच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का देण्याचे आदेश 16 फेब्रू 2024 रोजी देण्यात आले सुध्दा कामगारांना नाहक त्रास देत असुन सही व शिक्का देण्याचा मनमानी कारभार करून टाळाटाळ करीत आहे त्यामुळे जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने मा जिल्हाधिकारी साहेब यांना शुक्रवार दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी ओरिजनल कामगारांच्या समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले, या निवेदनावर आठ दिवसात काही कार्यवाही करण्यात आली नाही तर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय वर कामगारांन सह मोर्चा धडकल्या शिवाय राहणार नाही असा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला.निवेदन देते वेळी संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोफे.सम्येक म्हैसकर सविव.संजय शेळके सहसाचिव. सुजाता आर डोफे कोषाध्यक्षा.राहुल मोडक. नितीन डोमकावळे.नामदेव डायरे.शंकर चाफेकर.रवि जाधव. बाभूळगाव.राळेगाव तालुक्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते