चिंचोली तांडा, कुरळी घमापूर, (जांब )बोरगाव,या चार गावाना मिळणार शुद्ध पाणी,अनेक गावकरी किडनी च्या रोगापासून ग्रस्त


उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


उमरखेड तालुक्यामधील अनेक दिवसापासून किडनी आजारग्रस्त असलेल्या गावात अनेक महिला व पुरुषांना आपला जिव गमवावा लागला आहे या गंभीर विषयाबाबत शिवसेना तालूका अध्यक्ष तथा पं. सं. सभापती प्रवीण पाटील मिरसे यांनी 20एप्रिल रोजी माननीय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांची भेट घेऊन या प्रकारची व्यस्था मांडली त्यांची दखल घेत पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी तालुक्यातील ढाणकी जवळील चिंचोली तांडा, कुरळी घमापूर, (जांब )बोरगाव,या चार गावांना सर्वजनिक वॉटर फिल्टर मंजूर केल्याचे सांगितले या चारही गावांना ही योजना सुरु झाल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळेल असे शिवसेना तालूका अध्यक्ष प्रविण पाटील मिरासे यांनी सांगितले गत काही दिवसा पूर्वी जिल्हाचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचा जिल्हात दौंरा असताना प्रविण पाटील मिरासे यांनी तालुक्यामधील किडनीग्रस्त रुग्ण असलेल्या गावांची व्यथा त्यांच्या समोर मांडल्या होत्या तसेच सदर परिसरात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे हा आजार होत असल्याचे त्यांच्या निर्दनास आणून दिले तसेच 20एफिल रोजी प्रवीण पाटील मेराशे यांनी माननीय पालकमंत्री संजय भाऊ.राठोड यांची भेट घेतली. यावेळी संबंधित विभागातील आधीकरी सोबत संपर्क साधुन या चारही गावांना वॉटर प्लांट माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना मंजूर केल्याचे सांगण्यात आले.