

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रीय शिक्षण
धोरण २०२० अंतर्गत राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ताविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी राजीव गांधी महाविद्यालय राळेगाव मध्ये तालुका शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण 24 ते 1 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आले आहे . जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन राळेगाव प.स.गटशिक्षणाधिकारी राजू काकडे यांच्याहस्ते
करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी नवनाथ लहाने , समन्वयक प्रवीण देवकते, प्रशांत चांदोरे,,वसंत लोढे, विनोद चिरडे, कु. माया केवटे, कु शुभधा येवले, कु.कुमुद डाखोळे, कु.माधुरी धामंदे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण समन्वयक विनोद चिरडे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी मा. राजू काकडे यांनी सांगितले की, शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील कणा आहे.प्रवाहानुसार बदलणे ही काळाची गरज झालेली आहे. तसेच प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी नवनाथ लहाने यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व महत्व शिक्षकांना सांगितला. कार्यक्रमाचे संचालन कु सोनाली काळे व आभार प्रदर्शन कु शुभदा येवले यांनी केले. या प्रशिक्षणाला 150 शिक्षक उपस्थित होते…
