
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ B हा वडकी राळेगांव कळबं असा आहे हा पूर्णता काँक्रिटीकरण केलेला रस्ता आहे याचे काम दिलीप बिडकॉन या खाजगी कंपनीने केले आहे .काम करत असताना या संपूर्ण रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही कंपनीची राहील असा करार सुद्धा शासनाने कंपनीशी केल्याचे सांगितलेले आहे .असे असताना संपूर्ण रस्त्या च्या बाजूला व दुभाजकाच्या मध्ये काटेरी झुडपे वाढलेली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके व नगरपंचायतीचे बांधकाम सभापती मंगेश राऊत यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ६ १ बी या रस्त्यावर वाढलेल्या काटेरी झुडपांच्या संदर्भात व राळेगाव शहराच्या सुरुवातीपासून तर गावाच्या बाहेर पर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेले दिलीप बीडकॉन कंपनीने लावलेले स्ट्रीट लाईट बंद असून ते सुरू करण्याच्या संदर्भात यवतमाळ येथे जाऊन निवेदन दिले . यासंदर्भात अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने कुठलीच बाब मनावर घेऊन दिलीप बिडकॉन कंपनीला कुठलेच आदेश दिल्याचे समजले नाही .परंतु शहरातील व गावाबाहेरील ये जाकरणाऱ्या वाहन चालकांना व पादचारी लोकांना या काटेरी झुडपांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे काही तर अपघाताची सुद्धा प्रकरणे या काटेरी जोडपांमुळे झालेली आहे यासंदर्भात दिलीप बिड कॉन कंपनीने कुठलेच पाऊल उचलले नसून एकही काटेरी झुडप व स्ट्रीट लाईट सुरू केलेले नाही स्ट्रीट लाईटच्या संदर्भात महावितरण कंपनीचे दिलीप बिडकॉन कंपनीकडे लाखो रुपयांचे बिल थकीत असल्याने ते भरल्याशिवाय सुरू करता येणार नाही कलविले आहे.हे मात्र खरे आहे . अशा कंपनीवर नेमका वचक कोणाचा आहे किंवा ही कंपनी स्वायत्त आहे का या कंपनीला काही घेणे देणे नाही का हाही प्रश्न पुढे येतो आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा त्रास पाहता अखेर राळेगाव नगरपंचाय तिने पुढाकार घेऊन राळेगाव शहरात प्रवेश करणाऱ्या पहिल्या चौकापासून तर शहरातूनबाहेर पडणाऱ्या रस्त्यापर्यंत काटेरी झुडपे काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांनी जेसीबीने ही काटेरी झुडपे काढणे सुरू केले असून या काटेरी झुडपामुळे होणारा त्रास आता कमी होणार आहे . नगरपंचायतीने दाखवलेला शहाणपणा दिलीप बिडकॉन ने मात्र दाखवला नाही. राळेगाव नगरपंचायतीच्या पुढाकाराने होत असलेल्या या कामामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र सुखावले असून नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी धन्यवाद मानले आहे . परंतु निडरपणाने वागणाऱ्या दिलीप बिडकॉन कंपनीला रस्ता दाखवण्याकरता राळेगाव शहरातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांनी एकत्र येणे गरजेचे आहे तरच या कंपनीला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही अन्यथा लावलेले स्ट्रीट लाईट हे शोभेची वस्तू म्हणून उभे राहील . काटेरी झुडपांचा प्रश्न फक्त राळेगांव शहरा पूरता संपेल परंतु राळेगांव ते वडकी राळेगांव ते कळंब रस्त्यावरील काटेरी झुडपांचे काय असाही प्रश्न नागरीक विचारत आहे.
