
मारेगाव प्रतिनिधी नितेश ताजणे वणी:
गोरज येथे शेतातील कामे आटोपून घरी जाताना अंगावर वीज पडून ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास गोरज शिवारात घडली. यात सुदैवाने महिलेचा पती आणि त्यांच्या सोबत असलेले शेतमजूर थोडक्यातवाचले असून बैलाला किरकोळ इजा झाल्याची माहिती मिळाली आहे. वीज पडलेल्या महिलेचे नाव सुवर्णा संजय कांबळे, वय अंदाजे 32 मृत महिलेचे नाव आहे. आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी ती आपल्या पती आणि एका व्यक्तीसोबत शेतामध्ये गेले होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास शेतातील कामे आटोपून पती आणि शेतमजूर व्यक्तीसोबत ते सर्व बैलबंडीने घरी परतत होते. अशातच गोरज फाट्याजवळ महिलेच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यात महिला जागेवरच मृत्यूमुखी पडली तर पती आणि सोबत असलेला शेतमजूर जागेवरच कोसळले होते. सोबतच बैलही खाली पडलेला होता. महिलेच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा आप्ते परिवार पाठीमागे आहे
