
प्रतिनिधी ढाणकी(प्रवीण जोशी)
गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच सणावर
परिणाम जाणवला होता. यावर्षी मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यानेनागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
दिवाळी सण अवघ्या काही दिवसावर ठेपला असून
खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत,
असून विविध प्रकारचे आकाशदिवे व तोरणानी
बाजारपेठेत झगमगाट
पसरल्याचे चित्र पहावयास मिळत विशेष म्हणजे दिवलानी खरेदीसाठी सुद्धा गर्दी बघायला मिळत आहे.
सर्वात मोठा सण म्हणून
दिवाळीकडे पाहिल्या जाते. गेली
दोन वर्षे नागरिकांना कोरोनाच्या
प्रादुर्भावास सामोरे जावे लागले.
त्याचा परिणाम विविध सणावर
यावर्षी जाणवला. मात्र
नागरिकांमध्ये उत्साह भरपूर दिसतो आहे. सण उत्साहात पार
पडल्यानंतर आता सर्वात मोठा
म्हणून समजला जाणारा दिवाळी सण तोंडावर आला आहे. त्यामुळे
बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड वर्दळ दिसत आहे .
असून कापड दुकानात कपडे खरेदी
करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे
दुकाने हाऊसफुल झाल्याचे दिसून
येत आहे. तर दुसरीकडे घराला
करण्यासाठी विविध
प्रकारची तोरणे व इतर साहित्य
बाजारपेठेत दाखल झाले असून
दुकानासमोर लावलेल्या विविध
प्रकारच्या आकाश दिव्यामुळे
झगमगाट पसरला असून रात्रीच्या
वेळी आकाशदिवे सर्वांचे लक्ष वेधून
घेत आहेत. परिणामी ग्राहकांनी
केलेल्या गर्दीचा वाहतूकीवर परिणाम
जाणवत आहे.
