
ढाणकी/प्रतिनिधी: प्रवीण जोशी.
बहुप्रतिक्षीत बिटरगांव ते नानकपुर रस्त्याचा मुहुर्त लवकरचं लागणार. २०१९ पासुन या रस्त्याच्या प्रतिक्षेतील नागरीकांची प्रतिक्षा आता लवकरचं संपणार.
याबाबत सविस्तर वृत्त असे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बिटरगाव ते नानकपुर ३.५० किलोमीटर रस्त्याची सुधारणा, अंदाजे एक कोटी ७७ लाखाचे काम. पाच वर्षे त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करिता १३.९३ लाख रुपये असा रस्ता. आणि रस्ता सुधारण्याचा कार्यारंभ दि. ७/३/२०१९ ते पूर्ण होण्याचा दि. ६/१२/२०१९, त्यातच देखभाल दुरुस्ती दि. ७/१२/२०१९ ते दि.६/१२/२०२४ पर्यंत चा कालावधी असताना, हा रस्ता अजूनही जैसे थे चं परिस्थितीत आहे.कारण २०१९ मध्ये पूर्ण होणारा रस्ता २०२२ सुरू आहे, पण तो अजूनही जैसे थे चं का ? सदर रस्त्याचे कंत्राटदार मिथिलेश कन्स्ट्रक्शन उमरखेड असून, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यवतमाळ कार्यकारी अभियंता हे त्यावरील कार्यकारी यंत्रणा आहे.
ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून हा प्रकल्प अर्थसाहाय्यीत असून, प्रकल्प जैसे थे च दिसत आहे. याबाबत आमच्या प्रतिनीधीने कनिष्ठ अभियंता मु.ग्रा.सडक योजना,यवतमाळ माजीद शेख यांच्याशी दुरध्वनी हून संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले, हा रस्ता आता लवकरचं कामास सुरुवात होईल. २०१९ पासुन उशीर लागण्याचे कारण, कोरोना मुळे विलंब. आता पुढील हप्त्यात दिवट पिंपरी येथील रस्त्याचे हॉटमिक्स काम पूर्ण होईल त्यानंतर लगेच त्याच रस्त्याचं काम करणारी गँग बिटरगांव – नानकपुर रस्त्याच्या कामी लावू.
असे सांगीतले. त्यामुळे आता लवकरचं या रस्त्याचा मुहुर्त लागेल. रस्त्या अभावी या परिसरातील जनजीवन विस्कळीत आहे.या विभागातील गंभीर रुग्णांना दवाखाना गाठणे सुद्धा मुश्कील आहे. या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागुन जनतेची होणारी हेळसांड शासनाने थांबवावी. व येत्या १५ दिवसात सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आम्ही तिव्र आंदोलन छेडू असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
