कला वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छ्ता अभियान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

1 ते 31 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी राळेगाव येथील मयूर चौक परिसरात राष्ट्रीय सेवा योजना पथक कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव च्या स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छतेचे कार्य केले. विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिसरातील नाल्या, रस्ते, मैदान स्वच्छ केले तसेच प्रबोधनात्मक अनेक गीतांचे गायन केले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ विशाल दौलतकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. स्वच्छ्ता अभियानाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रमुख राज कोरले, सनी इंगोले, दिव्या झाडे, मयुरी क्षीरसागर, प्रतीक्षा कोवे, अल्तमश शेख, जगदीश नेहारे, रशिका नाळे, अस्मिता काळे, वैष्णवी चौधरी या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजय पातालबंसी यांनी रासेयो पथकाच्या या कार्याबद्दल विद्यार्थी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.