विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आरोग्यावर दुष्परीणाम होत आहे – मा. डॉ. जयश्री राऊत शिक्षणाधिकारी माध्यमिक

सहसंपादक: रामभाऊ भोयर

खैरी शिक्षण संस्था खैरी द्वारा संचालीत लोक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय खैरी , ता राळेगाव, जि. यवतमाळ येथे माझी शाळा सुंदर शाळा या राज्य शासनाच्या उपक्रमा अंतर्गत लोक विद्यालय खैरी येथे शाळा आई बाबांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नवोपक्रमाच्या उद्घाटन प्रसगी मा . शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. जयश्री राऊत यांनी आपले अभिमत व्यक्त केले पालकांनी आपल्या पाल्याची तुलना इतर विद्यार्थांशी करून आपल्या स्वतःच्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादु नये, त्यांना त्यांच्या गति नुसार शिक्षणाची संधी उपलब्ध करून घावी जेनेकरून विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहा पासुन दुर जाईल किंवा तो विद्यार्थी नाऊमेद होणार नाही या बद्दल पालकांनी माणसशास्त्रीय दृष्टया दक्ष असावे.
या प्रसंगी ख्यातनाम वक्ते मा. डॉ. प्रशांत लिलाबाई काशिनाथ गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांनी विद्यार्थी , पालक, आई बाबा, शिक्षक व समाजातील घटकांसाठी उपयुक्त असणाऱ्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले . समाजाच्या कोणत्याही स्तरातुन आलेला विद्यार्थी हा स्वयंप्रेरणेने शिकु शकतो यावर त्यांनी विश्वास दाखविला. पालकांना मार्गदर्शन करत असतांना आपल्या पाल्याला नकार पचवायला शिकविले पाहिजे त्यांचे लाड पुरवित असतांना सदसदविवेक बुद्धीने विचार करून मागणी मान्य करण्यास हरकत नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले हे सांगत असतांना निसर्ग नियमातील पशुपक्षांनी केलेल्या पिलांचे भरण पोषण कशा पद्धतिने केले जाते या बद्दलची ध्वनी चित्रफीत आधारा दाखल केली. शिक्षकांसाठी मार्गदर्शन करत असतांना भारतातील आदर्श शाळामध्ये असणाऱ्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करून प्रभावि अघापनाची कला कशी कसते या बाबत मार्गदर्शन केले.
या वेळी खैरी शिक्षण संस्था खैरी चे अध्यक्ष मा. श्री चेणकरणजि कोचर, सचिव मा. श्री. वसंतराव जवादे, शाळा समिती अधक्ष मा. श्री. हरिभाऊजी पंढरपुरे, उपाध्यक्ष मा. श्री. साईनाथ तंगडपल्लीवार , यशवंत विद्यालय घाटाना चे प्राचार्य मा श्री. सुरेंद्र शिंदे, मा. अभि. श्री. मिलींद जवादे, यवतमाळ जिल्हा माध्य पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. निलेश तायडे, माजी संचालक भारत गारघाटे व परिसरातील इतर शाळातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते तसेच शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन ढोके , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशश्वी केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. श्री. कैलास राऊत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक यांनी केले.
विद्यार्थी व पालक वर्ग तसेच उपस्थीत पाहुण्यांची भोजन व्यवस्था संस्थेद्वारे करण्यात आली.