कळमनेर येथील गावठाणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था ,खडीकरण करुन द्यावे ही गावकऱ्यांनी केली मागणी.

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कळमनेर येथील गावठाणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करुन द्या वे अशा आशयाचे तक्रार निवेदन विलास जूनघरे सह कळमनेर येथील नागरिकांनी आमदार प्राचार्य डॉ अशोकरावजी उईके यांना दिले आहे.
तेवीस वर्षापुर्वी हा गावठाणाकडे जाणारा रस्ता तयार केला होता.
त्यानंतर या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती,डागडूजी न झाल्याने रस्ता ठीकठिकाणी उखडला असून खड्डे पडले,त्यामध्ये पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य तयार झाल्याने आरोग्यासाठी धोकादायकआहे.
ग्रामपंचायत कळमनेर जवळ निधी नसल्याने हे काम होत नाही. आपण आपल्या आमदार निधीतून हे काम करावे अशा आशयाचे तक्रार निवेदन आमदारां सह उपविभागीय महसूल अधिकारी राळेगांव,तहसिलदार,गटविकास अधिकारी,अधिक्षक अभियंता यांना दिले आहे. निवेदनावर विलास जूनघरे,प्रदीप डंभारे,प्रमोद वैरागडे,बाबाराव वैद्य,दिलिप डोंगरे,आकाश राजकोल्हे,सह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरी आहे