
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अमरावती पिंपलखुटा येथे झालेल्या 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंरपर्यंत आंतर महाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धेत नवोदय क्रीडा तथा सांस्कृतिक मंडळाची खेळाडू तेजस्वी मडावी हीची पिंपलखुटा
स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळातील प्रदर्शन केल्यामुळे तिची आंतर विद्यापीठा करिता नागपूर विद्यापीठामधून निवड झाली.
तेजस्वि ने व्हॉलीबॉल खेळाची सुरुवात अगदी शालेय जीवनातून वयाच्या 14 वर्षापासून सुरुवात केली असून तीने नवोदय क्रीडा व तथा सांस्कृतिक मंडळ येथे प्रशिक्षण घेतले . शालेय जीवनात देखील शालेय क्रीडा स्पर्धेत तिने अतिशय चांगले प्रदर्शन करून संघाचे तथा शाळेचे नाव नावलौकिक केले होते, व्हॉलीबॉल मध्ये महाराष्ट्र असोसिएशन स्पर्धा व छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलिबॉल चषक या मोठ्या स्पर्धेत देखील तिने स्वतःच्या खेळाच्या बळावर निवड करून घेतली होती. सध्या ती अमरावती येथे कृषी महाविद्यालयाचे शिक्षण घेत असून तेथील व्हॉलीबॉल संघात तिने स्वतःची ओळख निर्माण करून अतिशय चांगले प्रदर्शन करीत आंतर विद्यापीठ संघात आपली निवड करून घेतली . त्यामुळे तिचा नवोदय क्रीडा मंडळाच्या वतीने छोटेखानी सत्कार करण्यात आला.तिने आपल्या प्रदर्शनाचे पूर्ण श्रेय नवोदय क्रीडा मंडळ यांना दिले असून तसेच नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर प्रशिक्षक प्रफुल खडसे , नरेश दुर्गे , गणेश काळे व नवोदय क्रीडा मंडळाचे खेळाडू मोनू खान, प्रविण गिरी, निखिल ठाकरे, अंकित क्षिरसागर, सोनु खान, आर्यन देवकर, जय डोंगरे, सुरज उजवणें, सुरज भगत, आदित्य मरसकोल्हे व मयुरी चौधरी यांना दिले आहे
