
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथे दि. 25/05/2025 ला इंटरनॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन लुधियांना (पंजाब) कंपनीचा आर्गनिक शेती व उत्कृष्ट शेतकरी सोहळयाचा कार्यक्रम ग्रामीण विकास प्रकल्प राळेगाव या ठिकाणी पार पडला, सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली, त्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला
आणि मित्रहो आरोग्य धनसंपदा आहे असे म्हटले जाते मानवी जीवनात उत्तम आरोग्या ला महत्वाचे स्थान आहे.
स्वस्थ भारत अभियान व आयुर्वेदिक अपनाये निरोगी जीवन पाये ऑरगॉनिक शेती धरती बचाव अभियान आर्थिक आझादी स्वदेशी अपनाये देश बचाये या सर्व उद्देशाने सतत 18 वर्षा पासून कार्यरत असलेल्या देश विदेशात गाजत असलेल्या .. इंटरनॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन (IMC) कंपनीचा कार्यक्रम राळेगाव येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमा मध्ये आर्गनिक शेती विषय मार्गदर्शन शेतकरी मेळावा व आयुर्वेदिक मार्गदर्शन आणि राळेगांव तालुक्यातील उत्कृष्ट शेतकरी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष,मा.श्री कमलेश हजारे कार्यक्रमाचे उदघाट्क, मा.श्री.गंगाधर घोटेकर
व प्रमुख अतिथी म्हणून
मा.श्री.दिलीप ठाकरे
मा. डॉ.इंगोले साहेब मा.ञानेश्वर मुडे मा.वीरेंद्र भाऊ चौहान (पत्रकार) ,संजू भाऊ कारवटकर (पत्रकार)युवा ग्रामीण पत्रकार संघटना जिल्हा उपाध्यक्ष, जयेश भाऊ पोपट,वाल्मिकराव मुडे हे होते, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कमलेश हजारे यांनी आर्गनिक शेती चे फायदे आणि रासानिक शेती मुळे शेती आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामावर चर्चा करण्यात आली , उदा, हार्ट अटॅक, कॅन्सर, बी. पी. शुगर थायराइड मधुमेह अशा बिमारी वाढत आहे. म्हणून आर्गनिक शेती करणे आवश्यक आहे, या गोष्टीवर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाचे आयोजक व सयोजक निवास्कर कांबळे ,संदीप सुरकार,कैलास कोडापे(पत्रकार) यांनी केले.आणि या कार्यक्रमाला या गजुभाऊ सुरकार, विजय सुरकार, किशोर लांभाडे पांडुरंगजी घोटेकर, नानाजी बेलेकर, विलास ठाकरे कवडूजी कुबडे,प्रवीण नेहरकर,संदीप पांम्पटीवार, भास्कर जवादे,उपास भोयर,मारोती आत्राम,शेतकऱ्यानी उपस्थिती दर्शवली होती.
