मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या बदलीमुळे राळेगाव न.पं. पुन्हा झाली पोरकी.

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

     

कोरोना काळानंतर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर एकीकडे राळेगाव नगरपंचायत ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी ओरड सुरू असताना यवतमाळ नगरपंचायत च्या मुख्याधिकारी व डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित असलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याकडे राळेगाव नगरपंचायत चा “प्रभार”सोपविण्यात आला.

आल्या आल्या च आपल्या कार्यकर्तृत्वाने आपली ओळख दाखविणाऱ्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी अल्पावधीतच शासकीय कामाचा “निपटारा”सुरू करण्याचा धडाका लावला. मुख्याधिकारी म्हणून यवतमाळ येथे त्यांची कारकीर्द बरीच गाजली, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांनी अनेक कामांना “हात “लावला राळेगाव सारख्या ग्रामीण भागातील समस्या त्यांना चांगल्याच ठाऊक असताना त्या सोडवित असताना त्यांना बरीच कसरत करावी लागली व ती त्यांनी केलीही !प्रभारी का होईना राळेगाव नगरपंचायत ला मुख्याधिकारी लाभला याचा थोडासा आनंद होता पण आता यवतमाळ नगरपंचायत मधून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बदली पदोन्नतीवर अमरावती येथे झाल्याने नगरपंचायत राळेगाव ही पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने पोरकी झाल्याची चर्चा जनसामान्यात चर्चिल्या जात आहे.
राळेगाव नगरपंचायत मध्ये अनेक कामे खोळंबलेली असताना किंवा कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची गरज असताना मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बदली ही राळेगाव नगरपंचायत साठी थोडी खेदाची बातमी आहे. यवतमाळ येथून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बदली झाल्याने यवतमाळकरांनी अनेक संघटनांनी या बदली विरोधात मोर्चे काढले धरने दिले यावरून त्यांची कामाप्रती असलेली ओळ व कर्तव्यदक्षता त्याची प्रचिती येते अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची राळेगाव नगरपंचायत मध्ये गरज असताना किंवा कायमस्वरूपी मुख्याधिकारी पाहिजे असताना त्यांची झालेली बदली ही खऱ्या अर्थाने वेदनादायक आहे. आता काही “वेळ” राळेगाव नगरपंचायत ची मुख्याधिकारी यांची जागा खालीच राहिल्याने त्यांची जागा घेण्यासाठी कोण येणार याची वाट पाहण्यापलीकडे राळेगावकरांना दुसरा
मार्ग नाही.