
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी निघालेल्या एका सोळा वर्षीय तरुणीचा अपघात होऊन मृत्यू झाला ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास वडगाव जवळील मोरगाव फाटा येथे ही घटना घडली. पूजा देवजी चिरपकटलेवार असे या मयत तरुणीचं नाव आहे. मयत पूजा देवजी चिरपकटलेवार जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवासी आहे. तिने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आकरावी नांदेड येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला होता आज सकाळी तिने कॉलेजला जाण्यासाठी घरा पासून काही अंतरावर महामार्ग रस्ता पार करत असताना भरधाव वेगात एम एच. 38 डी 0284या ट्रॅकने तरुणीला चिरडले. ट्रॅकचे चाक तरुणीच्या डोक्यावरून गेले त्यामुळे तरुणीचा घटनास्थळी मृत्यू झाला. तरुणीचा मृत्यू झाल्याने नागरिकामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यानट्रक चालकाचा नागरिकांनी पाठलाग केला त्यामुळे ट्रक चालकाने रस्त्यावरच ट्रक सोडत पसार झाला. राष्ट्रीय महामार्गावर वाहनाचा वाढलेला वेग आणि बेसुमार पळणाऱ्या गाड्या, बेशिस्त चालकामुळे अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे गाव तिथे गतिरोधक दिल्यास अपघाताच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसेल असे नागरिकांतुन ऐकावयास मिळत आहे. राष्टीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची नोंद घेऊन दिवसेंदिवस राजकीय महामार्गावर होत असलेले वाढते अपघाताला आळा घालण्याच प्रयत्न करावा असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
