संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेचे अनुदान लाभार्थी यांना विना विलंब द्या

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवेदनाद्वारे मागणी
गेल्या तीन ते चार महिन्यापासून श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांची परवड होत आहे त्यांच्याकडे औषधोपचार घेण्यासाठी पैसे उरले नसल्याचे व उपासमारीची वेळ आल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते शंकर गायधने यांच्या पुढाकारात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनाच्या लाभार्थ्यांच्या सही व अंगठे असलेले निवेदन तहसीलदार अमित भोईटे यांच्यासोबत चर्चा करून देण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद काकडे शहर प्रमुख इम्रान पठाण महिला आघाडीच्या पार्वता मुखरे योगेश मलुंडे प्रीतम महोदरे झाडगाव कलावती काळसर्पे उंदरी इत्यादी हजर होते तीन तीन चार चार महिने अनुदान प्राप्त होत नसल्यामुळे श्रावण बाळाचे लाभार्थी जेष्ठ नागरिकांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो या श्रावण बाळाच्या लाभार्थी जेष्ठ नागरिकांना त्वरित अनुदान उपलब्ध करून देऊन बँकांमधील गर्दी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने अनुदान वाटप करण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घेण्याचे आवाहन शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून चर्चेत करण्यात आले निवेदनावर श्रावण बाळाचे लाभार्थी शंकर राजाराम मेश्राम सयाबाई मारुती मेश्राम मुकुंदराव आनंदराव राऊत बेबी नारायण बावणे वेणू शंकरराव मेश्राम माधवराव डहाळकर अनुसया गुलाब काळसर्पे रामभाऊ मारुती मरस्कोले मारोतराव तोडासे वंताबाई मारोतराव तोडसे हरिभाऊ महादेव भुसारी वत्सला भुसारी सय्यद हाशम अली हुसेन सय्यद राळेगाव तुळसा महादेव झाडे कमला माधव बोभाटे शंकर पुसदेकार मना शंकर पुसदेकर विठ्ठल वैद्य झाडगाव किसनाजी माधवराव ढुमणे राळेगाव अंबादास नागोराव मेश्राम पुंडलिक अंबाझरे आशा रमेश राव महाजन लक्ष्मीबाई नारायण साखर कार दिगंबर शामराव कोपरे कांतीलाल चोरडिया इत्यादी लाभार्थी यांच्या स्वाक्षरी आहेत