
सहसंपादक : रामभाऊ भोयर
” शिक्षक दिन ” शिक्षकांच्या कार्याचा आदरतिथ्य सन्मान करणे, आणि शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय , या साठीच ” शिक्षक दिन ” कार्यक्रमाचे आयोजन विविध स्तरावर आयोजित केला जातो म्हणून आम्ही ” टु लिप पेठ पुजा ” सभागृहात शिक्षक सन्मान दिवस आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष कृष्णा जी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ हे होते तर मुख्य अतिथी , ॲड.सिमा तेलंगे, माजी जि .प.सदस्य डॉ अंजली गवार्ले,( गवार्ले पाइल्स हॉस्पिटलं यवतमाळ ) श्रीमती आशा काळे, संचालिका ग्राम स्वराज्य महामंच ही सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन – मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केले होते या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे १) बैलपोळा, झडती आणि बैल शृंगार स्पर्धेचे बक्षीस वितरण २) कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान असे होते या कार्यक्रमात बहुतांश शिक्षक, जेष्ठ नागरिक, शेतकरी, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रतिनिधी विविध स्तरावर काम करणारी व्यक्ती उपस्थित होते या ” शिक्षक दिनी” मा राजेंद्र कोल्हे गुरुजी ( पदविधर ) राळेगाव मा.बंडुजी पंधरे गुरुजी ( कळंब ) मा प्रल्हाद काळे गुरुजी ( यवतमाळ ) मा श्रावण पाडसेनेकुन गुरुजी , मा शंकरराव तोडासे,( सावंगी पेरका ) गुरुदेव सेवा मंडळ आजिवन प्रचारक ,मा धनरे गुरुजी आणि आडे गुरुजी अंतरगाव यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आणि “बैल पोळा स्पर्धा ” मध्ये प्रथम क्रमांक – विहान होले , केंद्रीय विद्यालय यवतमाळ द्वितीय क्रमांक – वेदांत भोंगाडे जे डी इंग्लिश मिडीयम स्कूल यवतमाळ यांनी घेतला आहे.याच कार्यक्रमात – मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आहे या प्रसंगी आनंद उत्सव साजरा केला होता या कार्यक्रमात सहभागी – मा गिरीधर ससनकर गुरुजी, संचालक ग्राम स्वराज्य महामंच मनिराम शाहगड दिलीप गौतम प्रेमा पत्रिवार,इशु माळवे विश्वास कुंभेकर,पपिता माळवे रमेश घोसले श्रीधर ढवस नितीन ठाकरे, चारुदत्त नेरकर, चंद्रशेखर ताम्हणे बहुतांश संख्येने लोक सहभागी झाले होते कार्यक्रमाचा शेवट – मा प्रिया माकोडे, यांनी आपल्या सुंदर कवितांच्या माध्यमातून केला आणि चहा नाश्ता देवुन कार्यक्रमांची समाप्ती केली
