
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शितला माता मंदिर परिसरात मांस, मच्छी, कोंबडी विक्री दुकान गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजारा च्या जागेवर अतिक्रमण करुन होती…
ही दुकाने येथून हटवावी या संदर्भात राळेगाव च्या नागरिकांनी स्वच्छता, दुर्गंधी, व इतर बाबी लक्षात घेऊन नगर पंचायत राळेगांव ला, इतर शासकीय अधिकारी यांना लेखी तक्रार निवेदन दिले…
त्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आणि रस्ता नजीकची जागा आखून देण्यात आली..
या संदर्भात दुकानदारां नी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली…
आज दुपारी तीन वाजता नगर पंचायत राळेगांव, पोलिस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहिम साठी पोहोचले, पण अवघ्या एका तासात “जैसे थे” चा न्यायालयाचा आदेश आला आणि अतिक्रमण हटाव मोहिम थांबली आहे…
यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सी ओ गिरीश पारेकर, नगर पंचायत राळेगांव चे अधिकारी व कर्मचारी
पोलिस निरीक्षक शितल मालटे आपल्या स्टाॅफ सह अतिक्रमण हटाव मोहीम स्थळी हजर होत्या…
