आदिशक्ती दुर्गामातेच्‍या भव्य मंदीराची उभारणी रवी बेलुरकर यांची संकल्‍पना साकार

वणीः शहरात अगदी मध्‍यभागी आदिशक्‍ती माता दुर्गादेवींचे सुंदर, देखणे मंदीर पुर्णत्‍वास आले आहे. तब्‍ब्‍ल 24 वर्षानंतर साकारण्‍यात आलेल्‍या मंदीरात भाविक भक्‍तांची मांदियाळी बघायला मिळत आहे. रवी बेलुरकर यांच्‍या संकल्‍पनेतुन साकार झालेल्या मंदीराची उभारणी मनमोहक आणि आकर्षक अशी आहे.  

शहराला सांस्कृतिक वारसा तर लाभला आहेच, शिवाय येथे भावभक्‍तीपुर्ण सन उत्‍सवांची रेलचेल सातत्‍याने बघायला मिळते. सर्वधर्मीय सनउत्‍सव धुमधडाक्‍यात साजरे करण्‍यात येते. नवराञोत्‍सवाच्‍या पावन पर्वावर रोशणाई आणि सुंदर रंगसंगतीचा अविष्‍कार असणारे दुर्गामातेचे मंदीर भक्‍तांसाठी विशेष आकर्षण ठरणारे आहेत.

आंबेडकर चौकातुन वामनघाटरोड या मार्गाने जात असताना मोठा मारोती हणुमान मंदिराला लागुनच हे मंदिर आहे. नवशक्ती दुर्गा मंडळांनी सुंदर व देखणी मातेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा 10 जानेवारी 1998 ला केली होती. तेव्‍हा पासुनच भाविक भक्‍तांची रेलचेल बघायला  मिळते, पुर्वी मंदीर छोटेसे होते. मंदीराची उभारणी भव्‍य स्‍वरुपात व्‍हावी याकरीता मंडळ प्रयत्‍नशील होते.

मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर व सहकारी उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव प्रमोद लोणारे, कोषाध्यक्ष चंदन मोहुर्ले, पुरुषोत्तम मांदळे, शिवा आसुटकर, राजकुमार अमरवानी, नितीन बिहारी, सतिश कामटकर, मारोती गोखरे, स्‍वप्‍नील बिहारी, अमोल बदखल,अशोक बतरा,विनोदकुमार मुथा, राजेश बिहारी, राजुभाऊ जयस्वाल, जगदीश ठोके, अशोक मांदळे, राहुल दानव यांनी अथक परिश्रम घेत सुंदर, देखने मंदीर पुर्णत्‍वास आणले.

एक वर्षापुर्वी दि. 10 जानेवारी 2021 ला मं‍दीराचा जिर्णोध्‍दार करण्‍यात आला. वर्षभरात  सुंदर व भव्य मंदीराची उभारणी करण्यात आली. मंदीराचे 80% टक्के काम पुर्णपणे होत आले आहे. नवराञोत्‍सवात महाआरती, महायज्ञ व विविध कार्यक्रम चालतात.  या माता मंदिरात वणी परिसरातील नागरिकांनी व भक्तांनी आवर्जुन भेट द्यावी  असे आव्हान दुर्गा माता मंदिर मंडळाचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केले आहे.