
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सावरखेडा येथे दिनांक ११ मे २०२६ रोजी बाल विवाह नियोजित करण्यात आला होता व तो बाल विवाह होणार असुन मुलीचे वय कमी आहे अशी माहिती मिळाली, मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव मा सागर विठाळकर यांना देण्यात आली, सदर माहिती मा.अमित भोईटे तहसीलदार राळेगाव तसेच मा केशव पवार गटविकास अधिकारी राळेगाव, यांना माहिती देण्यात आली तसेच राळेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने यांचे मार्गदर्शनात बालिकेच्या वयाचा पुरावा जिल्हा परिषद शाळा सावरखेडा यांचेकडून घेण्यात आला.यावेळी राजेंद्र राऊत सरपंच तथा अध्यक्ष गाव बाल संरक्षण समिती सावरखेडा, अमोल राऊत उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सावरखेडा,सुनील केराम मुख्याध्यापक जि. प. शाळा सावरखेडा, अंगणवाडी सेविका संगीता मोहद सावरखेडा यांची जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी संस्थात्मक अविनाश पिसुरडे यांनी टीम तयार करून सावरखेडा येथे प्रत्यक्ष बालिकेच्या कुटुंबास भेट देण्यात आली व बालविवाह चे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा आहे असे समजावून सांगण्यात आले. तसेच बालिकेचे लग्न १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावे अशा सुचना व सुचनापत्र देण्यात आले तसेच जवाब नोंद घेण्यात आली. सदरची कार्यवाही मा. विशाल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण,मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा मारोती पवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा देवेंद्र राजूरकर तसेच अविनाश पिसुरडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
