
प्रतिनिधी:वैभव महा
गडचांदूर- नांदा फाटा येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसरात नुकतेच अल्ट्राटेक कॉम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. कडूनिंब व पाम जातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाला अल्ट्राटेक कॉम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशनचे मुख्य व्यवस्थापक सतीश मिश्रा, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, डॉ. संजय ठाकरे, सचिन गोवार दीपे, तुषार पटेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मार्फत नांदा स्मशानभूमी परिसरात पुन्हा शंभर झाडाची लागवड करण्यात येईल असे. यावेळी मुख्य व्यवस्थापक सतीश मिश्रा यांनी सांगितले.
