
प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगांव तालुक्यात पावसाने चौवीस दिवसांपासून पिंजून काढले शेत्या खरडून गेल्या उभे पिके वाळत जात आहे तर कुठे शेतीला तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. अशातच राळेगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सरई येथील शेतकरी विनोद नानाजी राऊत वय वर्षे अंदाजे चाळीस वर्षे याने आज गावा नजीकच्या मशान भुमीतील झाडाला दोराच्या सहाय्याने चार वाजता आपली जिवन यात्रा संपवली . विशेष म्हणजे मृतकावर सोसायटीचे पंन्नास हजार रुपये कर्ज होते असे त्यांच्या कुटुंबियांकडून कळले . मृतक हा गेल्या दहा प़धरा दिवसांपासून जेवन करत नव्हता व परेशानीत राहत होता. त्यांच्यामागे आई, वडील असा परिवार होता. घटनेची माहिती मिळताच राळेगांव पोलिस घटनास्थळी जाऊन प़चनामा करून प्रेत उत्तरणीय तपासणी करिता राळेगांव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.
