
आरोग्य विभाग यवतमाळ द्वारा माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजने अंतर्गत नागरिकांन करिता आपला दवाखाना सुरू करण्यात आला . यात सुधारणा व्हवी याकरिता धीरज भोयर यांच्या नेतृत्वात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले
ही योजना चांगली आहे यात दुमत नाही, परंतु आपण ज्या हेतूने तो दवाखाना सुरू केला कुठेतरी तो हेतू साध्य होत नसल्याचे आम्हा तरुण पिढीला दिसत आहे दवाखाना प्रभाग क्रमांक १ मध्ये येत असून, दवाखाना हा नगरपरिषद शाळा क्रमांक पाच मध्ये आहे.या दवाखान्याबद्दल लोकांना योग्य माहितीच देण्यात आली नाही. दवाखान्याचा वेळाही माहित नाही,
तिथे काय काय सुविधा मीळतात याची सुद्धा माहीती उपलब्ध नाही .त्याचप्रमाणे आम्ही तिथे भेट दिली असता काही प्राथमिक गोष्टींची गरज आहे अस लक्षात आलं. तीथे technician आहे मात्र रक्त तपासणी बंद आहे, ANC महिला तपासणीसाठी आल्या तर वजन करायला वजन काटा उपलब्ध नाही. त्याच प्रमाणे शौचालय आहे पण पाणी व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाही.
या सुधारणा कराव्या जेणेकरून परिसरातील लोकांचा फायदा होईल.आमची आपणास विनंती आहे की वरील नमूद सर्व मुद्द्यांबाबत आपण एक पत्रक छापावे त्या पत्रकात वरील सर्व मुद्दे नमूद करावे आणि ते प्रभागात सर्वत्र वाटप करावे यावेळी मुंगोली ग्रामपंचायत चे सरपंच मा. रुपेश ठाकरे, कोना ग्रामपंचायत सदस्य नितीन तुरांकर, शुभम लुटे, राहुल असुटकर,इत्यादी तरुण मंडळी उपस्थित होती.
