अँड फिडेल बायदाणी यांच्या मृत्यूने शहरात पसरली शोककळा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

शहरातील व पंचक्रोशीतील नामवंत विधीज्ञ ॲड फिडेल बाबासाहेब बायदाणी यांचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
तालुक्यातील येवती येथील असलेले समाजसेवक बाबासाहेब बायदानी यांचे चिरंजीव विधीज्ञ अँड फिडेल बायदानी हे १९ जून रोजी अमरावतीला जातो म्हणून घरची मोफेड गाडी घेऊन निघून गेले मात्र रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने सर्व नातेवाईकांना व मित्रमंडळींना फोन केला असता त्यांच्या कडे सुद्धा नसल्याचे सांगण्यात आले त्यानंतर आज दिं २१ जून ला शहरातील घराच्या शेजारचे बोरकर यांचे शेत सोनूर्ली रोडवर असून बोरकर हे शेतात गेले असता फिडेल बायदानी यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला तेव्हा बोरकर यांनी घरी येवून सांगितले आहे तसेच याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला कळताच घटनास्थळी पोहचताच बायदानी यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे. परंतु अँड फिडेल बायदानी यांच्या मृत्यू ने शहरात व परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या मागे आई,भाऊ बहिणी, पत्नी कविता,समय व संयम ही दोन मुले असा आप्त परिवार आहे.