
जिवती :- राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर हे पेनठाणा ठिकाण अत्यंत प्राचीन असून हे पेनठाणा आपल्या आदिवासी समाजातील राजघराण्यानी बांधलेले आहे. परंतु राजुरा, कोरपना व जिवती परिसरातील बरेच पेनठाणे जीर्णो अवस्थेत आले असून त्यांची शासनाच्या पुरातत्व विभागाकडून जतन व जोपासना व्हायला पाहिजे मात्र होत नाही तेव्हा आदिवासी समाजाने असे किल्ले व पेनठाणे आहेत त्यांची जोपासना व जतन होण्यासाठी 21 गावातील आदिवासी समाज बांधव एकत्र येत सिद्धेश्वर येते दिनांक 9/9/2021 रोजी बैठक घेण्यात आली.
या पूर्वी मनिगड किल्ला येथे बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी पुरातन पेनठाणे व गड संरक्षण समिती गठीत करण्यात आली अध्यक्ष पदी भीमराव पाटील जुमनाके यांची निवड करण्यात आली.आपले पुरातन पेनठाणे व किल्ले जोपासणे, समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात समाजाने एकत्र येणे काळजी गरज आहे. खरे तर समाजकारण हाचं राजकारणाचा प्रवेशद्वार आहे. आजच्या नेत्यांनी प्रथम समाजकारण करावे नंतर राजकारण आपोआप घडून येते. समाजाच्या हितासाठी आदिवासी समाजाने एकत्र येऊन समाजाच्या अनेक समस्या मार्गी लावाव्यात असे प्रतिपादन पेनठाणे व गड संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके यांनी केले.या वेळी किसनराव मोकाशी, गोंडाराजे केशव आत्राम (पुनःगुडा), फकरू पाटील कोटनाके, लकू पाटील येळमे, संजय आत्राम, जंगु आत्राम, सोनेराव पेंदोर माजी सरपंच, संतोष सलाम, गुलाबराव पाटील आरके, जंगू कोवे, संजय कोवे असे 21 गावातील हजारोंच्या संख्येने गोंडीयन समाज बांधव उपस्थित होता.
