तोतया पोलिस बनत दोघांना लुटले, ठाणेदार विजय महल्ले यांची कारवाई ,पाच तासात अटकेत

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक २३/०४/२०२३ रोजी तक्रारदार विकास विठ्ठल कोडापे वय २५ वर्षे रा. करंजी सोनामाता ता. राळेगाव यांनी तकार दिली होती की, दिनांक २२/०४/२०२३ रोजी रात्री १०/३० वा.चे सुमारास त्यांना अनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून तसेच त्यांना प्लॅस्टीक लाठीने मारहाण करून त्यांचे खिशातील नगदी ३,५००/ रु जबरीने काढुन घेवुन गेले. या तक्रारी वरून पोलीस स्टेशन वडकी येथे अपराध क्रमांक २६९/२०२३ कलम ३९४, १७०, ३४ भारतीय दंड विधाण अन्वये नोंद करण्यात आला .
.. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने तसेच सदर प्रकरणामध्ये अज्ञात आरोपी इसमांनी तक्रारदार यांना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना पोलीस वापरत असलेल्या फायबरचे लाठीने मारहाण केली असल्याने सदर प्रकरणाचा तपास वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांनी स्वतःकडे घेवुन तपास केला व तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन नमुद तक्रारदार यांचे कडुन अज्ञात आरोपी इसमांचे सविस्तर वर्णन तसेच त्यांनी गुन्हयात वापरलेल्या वाहनाची माहीती प्राप्त केली अज्ञात आरोपीत इसमांची तांत्रीक दृष्टीकोनातुन तसेच गोपनीय बातमीदार यांचे मार्फत सविस्तर माहीती प्राप्त केली असता सदर अज्ञात आरोपी इसमांचा वर्धा जिल्हयातील वडनेर तसेच हिंगनघाट परिसरामध्ये शोध घेवून आरोपी१) महेन्द्र उर्फ बाळु रमेश अंबुलकर वय ४३ वर्षे रा. शास्त्री वार्ड हिंगनघाट जि.वर्धा २) दिपक पंढरी मेश्राम वय ४० वर्षे रा. करंजी सोनामाता ता. राळेगाव यांना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना गुन्हयाबाबत कौशल्यपूर्वक सविस्तर विचारपुस केली असता नमुद आरोपी इसमांनी तो व ईतर एक साथीदार यांने सोबत मिळुन सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी इसमांना सदर प्रकरणात दिनांक २३/०४/२०२३ रोजी रात्री ११/०० वा. गुन्हा दाखल होताच अज्ञात आरोपी इसमांची नावे व पत्ता निष्पन्न करून तांत्रीक बाबीने तपास करून व गोपनीय माहीतीचे आधारे अवघे ५ तासांत वडकी स्टेशनचे ठाणेदार विजय महाले व पोलीस पथकाने अटक केली. तसेच आरोपीकडून कडुन तक्रारदार यांची जबरीने चोरीस गेलेली रक्कम ३,५००/ रु तसेच आरोपीनी गुन्हयात वापरलेले एक चारचाकी वाहन, ०२ मोटर सायकल, पोलीस वापरत असलेल्या ०२ प्लॅस्टीक काठी असा सर्व मुद्देमाल हस्तगत केला. तसेच सदर प्रकरणात फरार असलेल्या एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाले आहे.

तसेच सदर प्रकरणाचा तपास करीत असतांना पो.स्टे. वडकी मध्ये अशाच प्रकारचा दुसरा गुन्हा ज्यामध्ये सुद्धा अज्ञात आरोपीत इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून तकारदार सुमेध लक्ष्मण लोखंडे रा. यवतमाळ यांचे कडुन सुद्धा नगदी रक्कम जबरीने हिसकावुन घेवुन गेले असल्याबाबत गुन्हा नोंद होता त्या प्रकरणा मध्ये सुद्धा नमुद आरोपी इसमांना कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता सदरचा गुन्हा सुद्धा नमुद आरोपी इसमांनीच त्यांचे फरार असलेले ईतर दोन साथीदार यांचे सोबत मिळुन केला असल्याची कबुली दिली आहे, सदरचे दोन्ही गुन्हे वडकी पोलीसांनी अवघ्या ०५ तासांत उकल करून अज्ञात आरोपीना अटक करून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले हे स्वतः करीत असून सदर प्रकरणामध्ये फरार असलेले आरोपी इसमांचे सविस्तर नाव व पत्ता निष्पन्न करण्यात आला आहे. आरोपी इसमांनी यवतमाळ जिल्हयात तसेच लगतचे जिल्हयामध्ये पोलीस बतावणी करून आणखी काही गुन्हे केले आहेत का? या सर्व बाबीचा उलघडा पुढे उघड होणार आहेत.

या प्रकरणाची कामगीरी मा. श्री. डॉ. पवन बनसोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. वडकीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले, पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख, पो.हे.कॉ विनोद नागरगोजे, ना.पो.कॉ विलास जाधव, सचीन नेवारे, पो.कॉ विकेश ध्यावर्तीवार यांनी पार पाडली