
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागजाई येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महामानवाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सत्कारमूर्ती मुख्याध्यापक हिम्मत काळे सर यांच्या कार्याचा आढावा घेत शाळा व्यवस्थापन समिती तथा गावकरी यांच्यामार्फत भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माझी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती राळेगाव चंद्रकांत शेळके सर हे प्रामुख्याने उपस्थित होते यांनी त्यांच्या कार्याची ग्वाही देत उपस्थित पालक वर्गामध्ये मौलिक शब्दाने आपले मनोगत व्यक्त केले जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी आजचे लहान मुलं उद्याची भावी नागरिक आहेत डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले की शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पण आपण विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो शाळेकडे पहिले लक्ष द्यायला पाहिजे ग्रामपंचायत कडून आलेला निधी जो आहे तो शाळेकडे वळविला पाहिजे सर्व पालकांनी जागृत राहिला पाहिजे 38 वर्ष चार महिने तीन दिवस माझी नोकरी झाली या नोकरीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी बोलण्याची मला संधी मिळाली आमची शाळा ही आहे मी दुसरा वर्ग इथे शिकलो त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पारधी सर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या कर्तुत्वाचा उल्लेख करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रबोधनाचा वसा असल्याबद्दल सांगितले यावेळी प्रामुख्याने उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश कांबळे उपाध्यक्ष संजय डफरे माजी अध्यक्ष प्रेमानंद वागदे विनोद शेळके निकिता मिसेकर करुणा वागदे रवींद्र पेंदाम अरविंद पिटेकर मनोज मिसेकर प्रगती उईके किरण नानवटकर दिपाली शेळके सहाय्यक शिक्षक भगत सर उंदरी शाळेचे सहाय्यक शिक्षक कचरे सर व समस्त पालक वर्ग तथा गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगत सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम कचरे सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले हर्ष उल्हासन विद्यार्थ्यांच्या सहानुभूतीने काळे सरांच्या कार्याचा गौरव करत निरोप समारंभाचा कार्यक्रम समस्त गावकरी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
