बिटरगांव ( बु ) ग्रामपंचायत पोटनिवडणूक अतिशय शांततेत , ( पक्ष विपक्षाच्या चूरशिला घवघवीत यश 635 पैकी466 नागरिकांचे झाले मतदान


प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु )

उमरखेड तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत बिटरगाव ( बु ) यथे वार्ड क्रमांक चार मधील ग्रामपंचायत सदस्या करिता पोटनिवडणूक लागली होती. यावेळी पक्ष व विपक्ष दोन्हीही बाजूचे एक विरुद्ध एक असे दोन महिला सदस्य पोटनिवडणुकीसाठी उभे होते. त्यामुळे गावातील मतदार बंधू आणि भगिनींनी यांनी जास्तीत जास्त मतदान केले आहे. संपूर्ण मतदान 635 होते त्यापैकी 466 मतदान झाल्यामुळे पक्ष विपक्ष कार्यकर्त्यांनी समाधानी चा श्वास घेतला आहे. बिटरगाव ( बु ) ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचि सुरुवात सकाळी7:30 मी. झाली तर 5 वा 30 मी. समाप्ती करण्यात आली. निवडणूक इमारत जि. प. शाळा बिटरगाव ( बु ) येथे करण्यात आली होती. सकाळी 7: 30 मी पासून ते सायंकाळी 5:30 मी. पर्यंत चोख पोलीस बंदोबस्त होता व बिटरगाव तलाठी मॅडम, कोतवाल, जि. प. शाळेचे शिक्षक. पोलीस पाटील, मतदान केंद्रावर आलेले अधिकारी यांच्या निर्देशनात अतिशय शांततेत मतदान झाले.