
सहसंपादक :- रामभाऊ भोयर
दिनांक 26 जून 2023 रोजी शाहू महाराज जयंती निमित्त अमली पदार्थ विरोधी दिन, नशा मुक्त भारत अभियान पंधरवडा समाज कल्याण विभाग यवतमाळ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व विधी प्राधिकरण राळेगाव, संयुक्त विद्यमाने शाहू महाराज जयंती व जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या. जटाळ साहेब प्रमुख अतिथी न्या. कुलकर्णी साहेब यांनी व्यसनापासून दुर राहण्याचा संदेश दिला. प्रमुख उपस्थिती अड.बोबडे साहेब यांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले, ॲड. वैभव पंडित सर यांनी व्यसन हा मानसिक आजार आहे ,त्यापासून दूर राहता येते. ॲड. प्रितेश वर्मा अध्यक्ष बार राळेगाव ,ॲड. अलोने, सर ,अड.काझी ,अड.मांडवकर,अड.गलाट ,अड.ॲड. खैरे, ॲड. गायत्री बोरकुटे , ॲड. योगेश ठाकरे, ॲड. वैशाली मोंडे, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, एटर्णी रुंद व पक्षकार उपस्थित होते .ॲड. रोशनी वानोडे (सौ. कामडी ) यांनी सूत्रसंचालन केले व्यसनमुक्ती महामानवांचे विचार ही पुस्तिका देऊन मान्यवरांचे स्वागत केले. व्यसनमुक्तीची शपथ दिली. ॲड.रुपेश सागर कर यांनी आभार प्रदर्शन केले.
