
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गुजरी नागठाणा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 18 /12/ 2023 सोमवार ते 23 /12/ 2013 बुधवार पर्यंत वंदनीय तुकडोजी महाराज यांचा 55 वा व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा 67 वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. या उत्सवानिमित्त दैनिक ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, ग्रामगीता वाचन, सामुदायिक प्रार्थना ,भजन, कीर्तन, प्रवचन, असे विविध मनोरंजनात्मक प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न. दि18 डिसेंबरला सकाळी 10 वा श्री जानरावभाऊ गिरी नगराध्यक्ष न पं राळेगाव यांचे शुभहस्ते उद्घाटन, प्रदीपभाऊ ठुणे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी राळेगाव यांचे अध्यक्षतेखाली , भामकरभाऊ ,उमेशभाऊ भोयर, गोविंदराव झोड ,यांचे उपस्थितीत झेंडावंदनाचे उद्घाटन संपन्न. सायं 8 वा गणेश शिंदे नेरी तालुका हिंगणघाट व संत यांचे भारुड संपन्न .दिनांक 19 डिसेंबरला सायंकाळी 8 वाजता ह भ प तुषार सूर्यवंशी व संच सप्त खंजिरी वादक यांचा विनोदी मनोरंजनात्मक प्रबोधन पर ग्रामगीतेवर कीर्तन संपन्न .दिनांक 20 डिसेंबरला सकाळी 9 वा वंदनीय तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे प्रतिमेची भजन ,दिंडीसह शोभायात्रा. शोभायात्रेत बाहेरगावातील 13 मंडळाचा सहभाग ,शोभायात्रेत घोडा व बाबाराव वैद्य कळमनेर यांनी गाडगे महाराजांची वेशभूषा केली होती, आणि बंटी घोटेकार यांनी तुकडोजी महाराजांची वेशभूषा केली होती ,हे या शोभा यात्रेत आकर्षण होते. दुपारी 12 वाजता ह भ प डफर महाराज यांचे काल्यावर कीर्तन 1 वाजता डॉक्टर ज्ञानेश्वर मुडे, शहरअली बापूलालानी यांच्या अध्यक्षतेखाली ,गणेश फटिंग, मधुकरराव गेडाम ,कृष्णाजी राऊळकर ,वाल्मीकराव मेश्राम, भगवंतराव धनरे ,हभप पांडुरंग महाराज सहारे ,यांचे उपस्थितीत समारोप कार्यक्रम संपन्न. या प्रसंगी सर्व सहभागी दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. 1982 पासून सतत 42 वर्ष झाले गुजरी नागठाना यथे पुण्यतिथी महोत्सव श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ यांचे सहकार्याने होत आला .परंतु सन 2022 पासून युवक मंडळ यांच्या पुढाकाराने परिश्रमातून महोत्सव साजरा होत आहे ,हे विशेष .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक श्री गंगाधर घोटेकार जीवन प्रचारक अ भा गु से मंडळ गुरुकुंज यांनी तर आभार प्रदर्शन योगेश गोंडे यांनी केले.
